Powered by Blogger.

Friday, 26 May 2017

अभ्यासाबरोबर खेळातील नैपुण्य महत्वाचे - प्राचार्य महादेव कानकेकर

No comments :

मुरगुड प्रतिनिधी (समीर कटके) दि 26

     केवळ शैक्षणिक गुणवत्ता विद्यार्थ्यांना स्वावलंबी बनवू शकत नाही. कोणत्याही एका खेळातील नैपुण्य  उच्चस्तरीय नोकरी व मानसन्मान मिळवून देते. शिक्षण क्रम तर पूर्ण करावाच लागतो त्याशिवाय तुमच्याकडे कोणते वैशिष्ठपूर्ण कौशल्य आहे याचे मूल्यमापन होते तेव्हा खेळाडू म्हणून चमकलेले विद्यार्थीच यशस्वी होतात. क्रीडानैपुण्य भाकरी आरोग्य व इमेज मिळवून देते हे लक्षात घेऊन अभ्यासाबरोबर आपल्या आवडीच्या व मान्यताप्राप्त क्रीडाप्रकारात हातोटी मिळवा , चिकाटी व सातत्य यशाचा गुरुमंत्र आहे हे लक्षात ठेवा,  या शब्दात खेळाडूंना मौलिक मार्गदर्शन व्हॉलीबॉल कोच प्राचार्य महादेव कानकेकर यांनी केले.
            मुरगुड ता कागल येथे मुरगुड स्पोर्ट्स असोसिएशनच्या वतीने आयोजित केलेल्या सहा दिवसाच्या फुटबॉल प्रशिक्षण शिबिराचे उदघाटन प्रा. कानकेकर यांच्या हस्ते संपन्न झाले  या प्रसंगी ते बोलत होते. मैदान पूजन माजी उपनगराध्यक्ष दगडू शेणवी यांच्या हस्ते करण्यात आले.
        शिबाराच्या पहिल्या दिवशी सब ज्युनिअर, ज्युनिअर व खुल्या गटातील 60 ल नोंदणी करून सहभाग दर्शवला. खेळाडूंना एन आय एस कोच व शालेय संघ निवड समितीचे सदस्य प्रा. राहुल पाटील यांनी मार्गदर्शन केले. प्रथम सत्रात खेळ, मैदान मापे वॉर्म अप कसरती आदीची बारकाव्यासह शास्त्रीय माहिती देण्यात आली.दुसरया सत्रात किक्स, रिसिव्ह, पदलालित्य, डिफेन्स, फॉरवर्ड लाईन खेळाडूंची भूमिका यांची माहिती देण्यात आली. तीसऱ्या सत्रात प्रत्यक्ष मैदानावर सराव सामना व विविध सूक्ष्म कौशल्याची माहिती प्रात्यक्षिकासह देण्यात आली. अशाच सत्रांमध्ये  पुढील 5 दिवस शिबिराचे कामकाज चालणार आहे.
    उदघाटन समारंभास विनायक गायकवाड, पांडुरंग पुजारी, अनिल अर्जुने, नंदकिशोर खराडे, शिवानंद बोरगावे,  सुरज एकल, सिद्धेश पोतदार, संतोष गुजर,  सागर सापळे यांच्यासह असोसिएशनचे भरत लाड, समीर कटके, एकनाथ आरडे, महादेव खराडे उपस्थित होते. स्वागत सागर भोसले, प्रास्ताविक प्रा डॉ सुशांत मगदूम यांनी केले. दगडू शेणवी, राहुल पाटील यांचे मनोगत झाले. आभार प्रा पृथ्वीराज कदम यांनी मानले.

फोटो - मुरगुड स्पोर्ट्स असोसिएशनच्या सहा दिवसाच्या फुटबॉल प्रशिक्षण शिबिराच्या उदघाटन प्रसंगी प्राचार्य महादेव कानकेकर, कोच प्रा राहुल पाटील, दगडू शेणवी व सहभागी खेळाडू.

No comments :

Post a Comment