Powered by Blogger.

Friday, 26 May 2017

सांगली कोल्हापूर राज्य मार्गालगत विक्रेत्यांची अतिक्रमणे - पोलिसांची डोळेझाक - संभाव्य अपघाताची शक्यता

No comments :

लक्ष्मण कांबरे/हेरले दि. २७/५/१७

सांगली कोल्हापूर राज्य मार्गावर  सांगली फाटा ते हातकणंगले पर्यंत मार्गालगत सिमेंटची बाकडी, फुलदानी, कुंडया, सिमेंटचे खांब आदी वस्तू उत्पादन करणाऱ्या कारागिरांनी रस्त्यालगत विक्रीसाठी या वस्तू ठेवल्याने रहदारीस अडथळा येत आहे . त्यामुळे ही  ठिकाणे अपघात प्रवण केंद्रे बनली आहेत. या ठिकाणाच्या वस्तू अडथळ्यामुळे संभाव्य होणाऱ्या  अपघाताने मोठा अनर्थ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तरी या वस्तू रस्त्यापासून तीस फूट लांब नेण्यासाठी वाहतूक नियंत्रण पोलीस दलाने विशेष लक्ष घालून ही समस्या दूर करावी अशी मागणी प्रवाशी वर्गातून होत आहे.
           कोल्हापूर -सांगली राज्य मार्गालगत शेतजमीन मोठया प्रमाणात आहे.परप्रांतीय कारागिरांनी या शेतजमिनीतील थोडासा भाग शेतकऱ्यांच्याकडून भाडेतत्वावर घेतला आहे. या फ्लॉटवर सिमेंटची बाकडी, मोठ्या छोटया कुंडया, फुलदानी सिमेंटचे खांब , शोच्या आदी वस्तू तयार करण्याची कार्य सुरू आहे. या वस्तू वजनाने जड जास्त जागा व्यापणाऱ्या आहेत त्यामुळे कारागिरांनी सर्व वस्तू उत्पादने रस्त्यालगत  मांडलेल्या आहेत. शेतकऱ्यांकडून कमी जागा भाडेतत्वावर घेऊन सर्व वस्तू लांबच लांब  पन्नास ते शंभर फूटापर्यंत मांडलेल्या आहेत.
            अपघात होऊ नये वाहनांना ओव्हर टेक व्यवस्थित करता यावीत यासाठी मुख्य रस्त्याच्या दोन्ही बाजूंना दहा दहा फुटांच्या साईड पट्टया तयार केलेल्या असतात. तसेच मुख्य रस्यापासून दोन्ही बाजूला तीस फूट दूर घरे, दुकाने किंवा इतर वास्तू बांधावयाच्या असतात. कारण रस्यावर चालकाचा गाडीचा ताबा सुटून अपघात होतात त्याचा फटका लगतच्या वास्तूंना होऊन जीवित व वित्त हानी होते. म्हणून रस्त्यालगत कोणत्याही वास्तू तीस फूटाच्या आत बांधण्यास कायदयाने मज्जाव आहे. मात्र या कारागिरांनी आपल्या वस्तू रस्त्यावरच विक्रीसाठी मांडून सगळे नियम ढाब्यावर बसविले आहेत.
          कारागिरांनी जास्तीत जास्त जागा भाडे तत्वावर घेऊन आपल्या वस्तू आपल्या जागेत विक्रीसाठी रस्त्यापासून तीस फूट दूर अंतरावर ठेवल्या पाहिजेत असे असतांना कमी जागा भाडेतत्वावर घेऊन  या वस्तू विक्रीसाठी रस्त्याच्या साईड पट्टीचा वापर केला आहे. या ठिकाणी वस्तू खरेदीसाठी प्रवाशी आपल्या गाडया रस्त्यावर लावतात, त्यामुळे वाहतूकीची कोंडी होत आहे. तसेच या बाकड्यावर सायंकाळी लोक बसतात. रस्त्यावरून एखादया गाडीचा ताबा सुटल्यास या ठिकाणी मोठा अनर्थ घडण्याची शक्यता आहे.

      हायवे पोलीस दलास या समस्या दिसून अनभिज्ञ का?                                                         सांगली फाटा ते हातकणंगले पर्यंत या वस्तू उत्पादन करणारे कारागीर रस्याच्या दोन्ही बाजूला आपला उद्योग थाटून बसले आहेत. या मार्गावरून पोलीस दलातील अनेक उच्चपदस्थ अधिकारी प्रवास करतात, हायवे पोलीसही याच ठिकाणी उभे राहून गाडया अडवून कागदपत्रकांची चौकशी करतात . मात्र वाहतूकीस अडथळा निर्माण करणारे हे कुटीरोदयोग त्यांना दिसत नसावा संशोधनाचा मुद्दा ठरत आहे.
         हातकणंगले पोलीस ठाणे व एमआयडीसी पोलीस ठाण्यांच्या कार्यक्षेत्रात ही कुटीरोदयोग सुरू आहेत. तरी दोन्ही पोलीस ठाण्याचा अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष या ठिकाणी निरीक्षण करून या विक्रीसाठी ठेवलेल्या व वस्तू हटवाव्यात आणि वाहतूकीस अडथळा ठ्ररत असलेली समस्या दूर करावी अशी मागणी प्रवाश्यातून होत आहे.
      रस्ता बांधणीसाठी लगतच्या शेतजमिनीचे भूसंपादन झाले असून शासनाने त्याची रक्कम जागा मालकांना आदा केली आहे. मात्र या कुटीरोदयोस जागा भाडेतत्वावर देणारे शेतकरी मालकांना रस्त्यात गेलेली जागा अजूनही आपलीच आहे. असे समजून त्या कारागिरांना रस्त्यावर वस्तू विक्रीसाठी पाठबळ दिले जात आहे.
    फोटो - कोल्हापूर -सांगली राज्य मार्गावर हेरले ( ता. हातकणंगले) येथील रसत्यालगत वाहतूकीस अडथळा व अपघातास कारणीभूत ठरत असलेल्या वस्तू ( छाया सुरेश कांबरे मौजे वडगांव)

No comments :

Post a Comment