Powered by Blogger.

Tuesday, 2 May 2017

आठ कोटींची 26 किलो सोन्याची पालखी अंबाबाईच्या सेवेत रुजू

No comments :


प्रतिनिधी - ज्ञानराज पाटील

महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठांतील प्रमुख पीठ असलेल्या करवीर निवासिनी श्री अंबाबाईच्या सेवेत कालपासून श्री महालक्ष्मी सुवर्णपालखी ट्रस्टच्या वतीने  सुवर्ण पालखी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीकडे हस्तांतरित करण्यात आली. अंबाबाईच्या  धार्मिक विधींमध्ये दर शुक्रवारी, पौर्णिमा आणि नवरात्रौत्सवात पालखी निघते.  पालखीच्या परंपरांना आता सुवर्णपालखीचे सुवर्ण वैभव लाभले आहे.
   
 सुवर्णपालखी वैशिष्ट्ये -
अंदाजे साडे सव्वीस किलो सोन्याचा वापर
एकूण खर्च अंदाजे आठ कोटींचा
27  हजार भाविकांकडून 26 किलो सोनं देणगी स्वरुपात
साडेतीन किलो सोन्यात मोर्चेल आणि चवऱ्या
साडेबावीस किलो सोन्यामध्ये अंबाबाईच्या लाकडी पालखीला सोन्याच्या पत्र्याचा नक्षीदार मुलामा
संपूर्ण पालखीवर ऐश्वर्याचे प्रतीक असलेले हत्ती आणि पानाफुलांची वेलबुट्टीची नक्षिकाम

No comments :

Post a Comment