Powered by Blogger.

Tuesday, 2 May 2017

माले( ता. हातकणंगले) येथे श्री शिवछत्रपती तीर्थक्षेत्र भूमिपूजन सोहळा

No comments :
हेरले/ प्रतिनिधी दि.२/ ५/१७   
                                               
  
   गावच्या मुलभूत विकासा बरोबरच पाटील बंधू शिवतिर्थ क्षेत्र उभारणीचे कार्य करीत आहेत, त्यांचे समाजाभिमुख  कार्य गावकऱ्यांच्या सदैव स्मरणार्थ राहील. या अतुलनिय कार्यामुळे गावामध्ये राजा शिवछत्रपती यांचेे तेजस्वी कार्याचे स्मरण युवकांच्या मनात सदैव तेवत राहील. असे मत मुख्य सुरक्षा अधिक्षक रेल्वे सुरक्षादल दक्षिण पश्चिम रेल्वे व सल्लागार राजा शिवछत्रपती मालिका डी.बी. कासार यांनी व्यक्त केले. ते माले( ता. हातकणंगले) येथे श्री शिवछत्रपती तीर्थक्षेत्र भूमिपूजन सोहळा निमित्त कार्यक्रम प्रसंगी बोलत होते.
      माजी उपसरपंच बंटी पाटील व त्यांचे जेष्ठ बंधू व्यावसायिक सतिश पाटील यांनी स्व: खर्चाने पंचवीस लाख रुपये बजेटचे नियोजित शिवतिर्थ क्षेत्र उभारणीचे कार्य सुरू केले आहे. त्यासाठी गावांमध्ये एक गुंठा पाच लाख रुपये देऊन गावच्या मध्यवर्ती भागात प्लॉट खरेदी केला आहे. त्या  ठिकाणी वीस लाख रुपये बजेटचे श्री शिवछत्रपती तीर्थक्षेत्र उभारीत आहेत. या ठिकाणी एकशे एक फुटी भगवा ध्वज , एकवीस फुट डंबरी त्यामध्ये राजा शिवछत्रपती यांचा सिंहासनावर बसलेला ब्राँझचा सात फुटी पुतळा उभारल जाणार आहे. महाराष्ट्रात तिसऱ्या क्रमांकाचे हे शिवतिर्थक्षेत्र माले गावी आकारास येत आहे.
     या शिवतिर्थ क्षेत्राचे भूमिपूजन व पायाभरणी कार्यक्रम संपन्न झाला याप्रसंगी आम.डॉ. सुजित मिणचेकर , आम. अमल महाडीक, जि.प. सदस्य प्रसाद खोबरे, माजी सभापती राजेश पाटील, वृतपत्र राष्ट्रीय संघटनेचे राज्य संघटक प्रविण पाटील, डॉ. सचिन पोवार, व्याख्याते डी.डी. कुडाळ्कर, लालासो पाटील, शिरीष पाटील, डी.आर. माने , दिलीप पाटील, संतोष खोत, उपसरपंच महेश पाटील आदी मान्यवरांसह ग्रामस्थ उपस्थित होते.
             फोटो -  माले( ता. हातकणंगले) येथे कार्यक्रम प्रसंगी बोलतांना डी.बी. कासार व समोर मान्यवर्ग.

No comments :

Post a Comment