Powered by Blogger.

Monday, 1 May 2017

कोल्हापुरात देशातील द्वितीय क्रमांकाच्या उंच तिरंगा ध्वजाचा लोकार्पण सोहळा संपन्न

No comments :

प्रतिनिधी - ज्ञानराज पाटील
आज 1 मे 2017 महाराष्ट्र दिन कोल्हापूरकरांसाठी अत्यंत महत्वपूर्ण व अभिमानास्पद ठरलाय आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अभिनेता अक्षय कुमार, गृहराज्यमंत्री दिपक केसरकर, पोलीस महासंचालक सतीश माथुर, पालकमंत्री चंद्रकांत पाटील, श्रीमंत शाहू महाराज आणि खासदार, आमदार यांच्या उपस्थितीत देशातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात उंच व राज्यातील पहिल्या क्रमांकाच्या उंच तिरंगा ध्वजाचा लोकार्पण सोहळा संपन्न झाला.

  वाघा बॉर्डरनंतर देशातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात उंच अशा 303 फुट उंचीच्या ध्वज आज महाराष्ट्र दिनी कोल्हापुरात फडकला.
        त तत्पूर्वी आज पहाटे 5 वाजून 48 मिनिटांनी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरिक्षक विश्वास नांगरे-पाटील उपस्थित होते.

      उद्यानातील प्रशस्त जागेत हा 303 फूट उंचीचा ध्वजस्तंभ उभारण्यात आला आहे, वाऱ्याच्या झोताने ध्वजाचे नुकसान होऊ नये म्हणून त्यासाठी स्पेशल पॉलिस्टर पॅराशुट फॅब्रिक्सचे कापड वापरले आहे. या स्तंभावर फडकणारा तिरंगा 24 तास विद्युत रोषणाईच्या झोतात फडकणार आहे. त्यासाठी स्वतंत्र जनरेटरची सोय केली आहे.
ध्वजसंहिता नियमानुसार त्याची तंतोतंत अंमलबजावणी केली जाणार आहे. उद्यान व ध्वजस्तंभ येथे 2 पोलीस शिपाई 24 तास पहारा देतील. याठिकाणी येणा-या पर्यटकांना माहिती सांगण्यासाठी प्रशिक्षक (गाईड) ठेवला जाणार आहे.

No comments :

Post a Comment