Thursday, 4 May 2017
डॉ.तमीर दानवाडे यांना दक्षिण कोरीया येथे 'बेस्ट केस अॅवॉर्ड' ने सन्मानीत
हेरले/ प्रतिनिधी दि. ३/५/१७
शिरोळ तालूक्यातील कुरुंदवाड नगरीचे सुपूत्र आणि सध्या हैदराबाद येथील सुप्रसिध्द 'केअर हॉस्पीटल'येथे हदयरोग तज्ज्ञ म्हणून कार्यरत असलेल्या डॉ.तमीर दानवाडे यांच्या केस प्रेझेंटेशनला दक्षिण कोरीया मध्ये बेस्ट केस अॅवॉर्ड ने सन्मानीत करण्यात आले.यामुळे कुरूंदवाड नगरीच्या या सुपूत्राचे सर्वत्र कौतुक होत आहे.
सीव्हीआरआएफ दक्षिण कोरीया मार्फत 'टीसीटीएपी 2017'ही हदयरोगतज्ज्ञांची परिषद सेऊल येथे दि.25 ते 27 एप्रिलच्या दरम्यान आयोजीत करण्यात आली होती.यामध्ये डॉ.तमीर यांच्या 'थ्रोम्बोटीक आक्लुजन अॉफ लेप्ट मेन कोरोनरी आर्टरी इन यंग पेशंट' या केसची निवड झाली होती.या परिषदेमध्ये जगभरातील सुमारे 3000 हदयरोग तज्ज्ञांचा समावेश होता.सदर परिषदेमध्ये डॉ. दानवाडे यांनी सादर केलेल्या केसची निवड करतानाच त्यांना क्वालांलांपूर (मलेशिया) येथील डॉ.वॉन अझमान वान अहमद यांच्या हस्ते सन्मानीत करण्यात आले.जगप्रसिध्द अमेरीकन हदयरोगतज्ज्ञाच्या(जेएसीसी) या जर्नल मध्ये या केसचे प्रकाशनही करण्यात आले होते.
डॉ.तमीर दानवाडे हे कुरूंदवाडमधील नामवंत सेवानिवृत्त शिक्षक अ.शा.दानवाडे यांचे सुपूत्र आहेत.त्यांनी जे.जे.मेडीकल कॉलेज मुंबई येथून एम.डी. (मेडीसीन) ही पदवी प्राप्त केल्यानंतर हैदराबाद येथून डी.एन.बी.(कार्डीअॉलॉजी) ही पदवी प्राप्त केली.सध्या ते हैदराबाद येथे हदयरोगतज्ज्ञ म्हणून काम करीत आहेत. त्यांच्या या यशाने कुरूंदवाड नगरीच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असून यामुळे त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
फोटो-
कुरूंदवाड नगरीचे सुपूत्र डॉ.तमीर दानवाडे यांच्या केसला दक्षिण कोरीया येथे'बेस्ट केस अॅवॉर्ड' ने सन्मानीत करताना मलेशियाचे डॉ.वॉन अझमन वान अहमद
कुरुंदवाडच्या या सुपुत्रास मानाचा मुजरा...
ReplyDeleteCongratulations sir
ReplyDeleteAjim panhali,kurundwad