Saturday, 27 May 2017
शेतकऱ्याला स्वतःच्या पायावर उभे करणे हेच सरकारचे प्रमुख उद्दिष्ट - ना चंद्रकांत पाटील
-बोरपाडळे - प्रतिनिधी - कृष्णांत हिरवे
शेतकऱ्याला स्वतःच्या पायावर उभे करणे हेच सरकारचे प्रमुख उद्दीष्ठ आहे, असे प्रतिपादन पालक मंत्री चंद्रकांत पाटील यांनी पन्हाळा तालुक्यातील पैजारवाडी येथे शिवार संवाद यात्रा कार्यक्रमात केले.
शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याबाबत सरकार सकारात्मक विचार करत आहे पण परत पुन्हा कर्ज काढण्याची किंवा कर्जमाफी मागण्याची वेळ शेतकऱ्याच्या वर येऊ नये यासाठी शेतकरी सक्षम करण्याच्या दृष्टींने सरकार पावले उचलत आहे .
महाराष्ट्र शासनाने शेती बाबतचा अर्थसंकल्प 12 हजार कोटी वरून 25 हजार कोटी पर्यत नेण्याचा सरकारनं प्रयत्न केला,त्याच बरोबर राज्यात या1 लाख 11हजार शेततळी ,वीज,अपुरी धरणे पूर्ण करणे,गावा गावात पावसाच्या पाण्याचा साठा वाढवणेसाठी जलयुक्त शिवार , माती परीक्षण, हवामान यंत्र ,ऊस,कापूस, तूर, यासारख्या बावीस पिकांच्या उत्पादनास ठोस हमीभाव देण्यास सरकार बांधील आहे.
शेतकऱ्याला जोड धंदा साठी शेळीपालन, कुकुटपालन, अशा अनेक योजना देण्याचे धोरणात्मक निर्णय घेतले असून 100 शेतकरी एकत्र आल्यास ठिबक शीचनासाठी 75% अनुदान देण्याचे नियोजित आहे.
शेतकर्याला सक्षम करन्यासाठी उत्पादन खर्चात भागीदारी करण्याचा सरकारचा मानस आहे या सर्व योजना सर्वसामान्य शेतकऱ्या पर्यत पोहचवण्याचे काम राजकीय वैर विसरून तरुण मंडळांनी केलं पाहिजे तरच आपला शेतकरी खऱ्या अर्थाने कर्ज मुक्त होईल असे त्यानी सांगितले .
या कार्यक्रमावेळी जि, प, सदश्य शिवजीराव मोरे ,भाजप जिल्हा अध्यक्ष हिंदुराव शेळके, तालुका अध्यक्ष सुरेश बेनाडे युवा मोर्चा अध्यक्ष सचिन शिपुगडे, उत्तम बवडेकर, पैजारवाडी उपसरपंच सागर हिरवे, सदश्य विठ्ल चिले, अलका हिरवे, दीपाली साठे ,आबाजी पोरे, जेऊर उपसरपंच धोंडीराम पाटील ,चिले महाराज स्वथान अध्यक्ष बाबासाहेब चव्हाण बाबुराव गराडे को. नगरसेविका अर्चना पगार ,अनिल चिले ,महादेव पोरे,शिवाजी गराडे,सचिन चिले ,संदीप गवळी राकेश साठे,दिलीप गरडे, बी.के. घोसाळकर शंकर घोसाळकर धोंडीराम चिले ,संजय यादव ,बापूजी यादव,रवी साठे,विलास जाधव,आणि परिसरातील शेतकरी उपस्थित होते. स्वागत गोकुळ संचालक बाबा देसाई यांनी तर आभार केदार उरूनकर यांनी मानले
*ठळक*
मंत्रीमहोदय चंद्रकांत पाटील सांगितलेल्या योजना
* सरकारने राज्यात शेतकऱ्याकडून 9 लाख टन तूर खरेदी
*100 शेतकरी एकत्र आल्यास 75% अनुदान ठिबक साठी देणार
* शेळीपालन ,कुकुटपालन साठी अनुदान देऊन मिळणारी अंडी शेतकऱ्याच्या कडून सरकारं विकत घेणार व शाळेत मध्यांन भोजनासाठी देणार
* गाव गावात माती परीक्षण केंद्र व हवामान अंदाज यंत्र सुविधा
*राज्यत गावो गावी जलयुक्त शिवार साठी पयत्न
* भविष्यात शेतकऱ्यासाठी मोफत बियाणे,खते, मजूर,पुरवून उत्पादन खर्चात भागीदारी करण्यासाठी प्रयत्न त्या मध्ये 9 लाख शेतकरी निवडून प्रथम धारवाड ता भुदरगड येथे प्रायोजित तत्वावर राबवणार
No comments :
Post a Comment