Powered by Blogger.

Thursday, 18 May 2017

शीतपेये प्या आणि गाठी व सांधेदुखीला आमंत्रण द्या

No comments :


साखरेचे प्रमाण जास्त असणारी शीतपेये  पिणार्यांमध्ये गाठी होण्याची शक्यता जास्त असते. विशिष्ट प्रकारच्या अल्कोहोलपेक्षाही सॉफ्टड्रिंकमुळे गाठींचा धोका जास्त असतो.याच गाठींची पुढे अनियंत्रित वाढ झाली तर धोका कॅन्सरवरही जाऊ शकतो
एका नव्या संशोधनात ही बाब आढळली आहे. या गाठी सुजून त्यामुळे खूप वेदना होण्याची शक्यता आहे. रक्तात युरीक एसिडचे प्रमाण जास्त झाल्याने युरीक एसिडचे कण सांध्यांपाशी साठून या गाठी होतात. तसेच युरीक अॅसिड वाढल्यामुळे गाउट किंवा सांधेदुखी हा प्रकार सुरू होतो
व्हॅंक्युअरच्या ब्रिटीश कोलंबिया विद्यापीठातील ह्योन के. चोई व हर्वड मेडिकल स्कूलचे गॅरी चर्चन यांच्या नेतृत्वाखाली केलेल्या संशोधनात ही बाब आढळून आली. साखरेचे प्रमाण जास्त असलेली सॉफ्ट ड्रिंक व फ्रुक्टोज ( साखर व कायबोहायड्रेड्स यात असतात. त्यामुळे युरीक एसिडचे प्रमाण वाढते.) यांच्यामुळे होणार्या गाठींचा संबंधा यांनी शोधून काढला. त्यासाठी चाळीस वर्षांवरील ४६ हजार जणांची तपासणी करण्यात आली. यांना त्यापूर्वी बारा वर्षांपर्यंत गाठी झालेल्या नव्हत्या. विविध सॉफ्ट ड्रिंक  किती घेतली त्यानुसार त्यांचा अभ्यास करण्यात आला. बर्‍याचदा गाठी होण्याची कारणे सापडत नाहीत तसेच सांधेदुखीची कारणे सापडत नाहीत पण आता अशा आजाराने ग्रासलेल्या लोकांनी स्वतः आपली चिकित्सा करावी व शीतपेयांना रामराम ठोकावा.

No comments :

Post a Comment