Powered by Blogger.

Monday, 8 May 2017

हातकणंगले दुय्यम निबंधक कार्यालयात नागरिकांची ससेहोलपट, दस्तासाठी वारंवार हेलपाटे मारण्याची वेळ

No comments :

हेरले/लक्ष्मण कांबरे दि.७/५/१७  

                                               
   हातकणंगले दुय्यम निबंधक कार्यालयात  सुविधांच्या अभावामुळे हातकणंगले तालूक्यातील या कार्यालयातील नोंदणी दस्तासाठी नागरिकांचे हाल होत आहे.महिना २५ लाखाहून अधिक महसूल मिळवून देणारी शासन यंत्रणा  सुविधा देण्यासाठी उदासिन असलेने नागरिकांत असंतोष निर्माण झाला असून संभाव्य काळात जनतेचा उद्रेक होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
            हातकणंगले तालूका सधन असून अडीच ब्लॉकचा आहे. या तालूक्यात ६२ मोठी गावे समाविष्ट आहेत. हातकणंगले पेठेवरती दुय्यम निबंधक कार्यालय कार्यान्वित आहे. खरेदीपत्र , वाटणीपत्र, गहाणखत, बक्षिसपत्र, हक्कसोडपत्र, नोटीसा इंटीमेशन, डिक्लीरेशन आदींची नोंदी शासन फी भरून नोंदणी केली जाते. या कार्यालयात  प्रभारी दूय्यम निबंधक , तीन लिपीक, एक शिपाई आदी कर्मचारी वर्ग कर्तव्य बजावत आहेत.
     मात्र हे कार्यालय वीस बाय वीसचे असल्याने खूपच दाटीवाटीने कर्मचारी बसलेले असतात. त्यांना भौतिक सुविधा ज्या हव्या आहेत , त्या प्रशस्त जागेच्या अभावामुळे या कार्यालयाची खुरूड्यासारखी अवस्था निर्माण झाली आहे.
        ६२ गावातून या कार्यालयात नागरीक येतात. बसण्यासाठी जागेचा अभाव, आतमध्ये दस्त नोंदणीसाठी गेलेनंतर साधे उभा राहण्यासाठी ही जागा नसते, कोंडवाड्याची अवस्था निर्माण झाली आहे. अडीच वर्षापासून आठ बॅटऱ्या खराब झालेने लाईट गेली असता नोंदणी यंत्रणा ठप्प होते. दिवसागणिक चाळीस दस्त होणे गरजेचे असता , वीस ते पंचविसच दस्त होतात. तसेच सात बारा ऑनलाईन काही चुकेची झालेले असलेने  दस्त नंबर आला असता या चुकीची दुरुस्तीसाठी हेलपाटे मारावे लागत आहेत. कर्मचाऱ्यांना बसणेस पुरेसा जागाही नाही. त्यामुळे या कार्यालयात सदैव गर्दी दिसून येते गोंगाट असतो. दोन दिवसात दस्त होणे गरजेचे असता पाच ते सहा दिवस दिवसभर बसावे लागत असून अनेक वेळा हेलपाटे मारावे लागत असल्याने नागरिकांच्यात या कार्यालयाबद्दल घृणा निर्माण झाली आहे. दस्त करणेसाठी शासन फी भरून घेते मात्र सुविधा योग्य देत नसलेने ससेहोलपट मात्र जनतेची मोठया प्रमाणात होत आहे.
                हातकणंगले पेठेवरती तीस बाँड रायटर, पंचवीस विधीज्ञ कार्यरत असून कोल्हापूर जिल्हयात सर्वात जास्त या कार्यालयाकडून शासनास महसूल प्राप्त होतो. मात्र सर्व्हर डाऊन समस्या , बॅटरी नसलेने संगणक बंद या समस्यामुळे प्रत्येक दिवसी दोन तास काम ठप्प होते. या कार्यालयाची रचना कोंडवाड्याची झाली आहे.
   
      प्रभारी दुय्यम निबंधक कुरुंदकर यांना या समस्ये बद्दल विचारले असता, त्या म्हणाल्या की या कार्यालयात आपुरी लाईट सेवा, भौतिक सुविधा, कार्यालयाची अपुरी जागा, या आवश्यक घटकांचा अभाव व लोकप्रतिनीधीे, राजकिय घटक यांचे प्रेशरमुळे येथे महिला अधिकाऱ्यांना काम करणे कठीण झाले आहे. आम्ही कर्तव्य भूमिकेतून सेवा बजावत आहे. मात्र दररोज अपेक्षित कार्य आवश्यक सुविधांच्या अभावामुळे होत आहे. त्याचा फटका बसून जनतेचे अतोनात हाल होतात आणि चार ते पाच दिवस हेलपाटे मारावे लागत असल्याने दररोज काही प्रसंगी वादाचा प्रसंग निर्माण होतो. यामध्ये आमचा काहीही दोष नाही हे सर्वांनी समजून घ्यावे ही विनंती.
        जिल्हा निबंधक भुते यांनी हातकणंगले कार्यालयाची दुरावस्था पाहून या ठिकाणी शासनाकडून आवश्यक त्या सुविधा पुरविण्यासाठी लक्ष्य केंद्रीत करावे. कोल्हापूर जिल्हयात सर्वात अधिक महसूल शासनास मिळवून देणारे कार्यालयात सोयी सुविधांचा अभाव हे प्रशासन व लोकप्रतिनिधींना दिसत नाही का?
त्यावर योग्य उपाययोजना का होत नाही?      

गांधारीची भूमिका सोडून तात्काळ आवश्यक त्या सोयीसुविधा कार्यालयास पुरवाव्यात आणि जनतेचे हाल थांबवावे अशी मागणी हातकणंगले तालूक्यातील सर्वच गावातील जनतेतून होत आहे.

     फोटो - हातकणंगले दुय्यम निबंधक कार्यालयातील  सोयी सुविधाचा अभाव असलेने सदैव झालेली गर्दी
( छाया सुधाकर निर्मळे )

No comments :

Post a Comment