Wednesday, 10 May 2017
फक्त शाळेतच का? तक्रार पेटी सर्वत्र हवी...सोशल मीडियावर टिकांचा पाऊस
नुकताच सरकारने प्रत्येक शाळेत तक्रार पेटी बसवावी असा आदेश काढला आहे, यामुळे शाळेतील शिक्षकांच्या तक्रारी करता येईल व त्या अनुषंगाने प्रशासनाला अंकुश ठेवता येईल असा सरकारची भूमिका आहे पण दुसर्या बाजूला शिक्षक वर्गाने यावरून सोशल मीडियावर टिकांचा पाऊस पाडला आहे, यातील एक अनावृत पत्र आमच्या हाती लागले ते असे,
मा. मुख्यमंत्री साहेब ,
आपण पारदर्शी कारभाराचे आग्रही आहेत, आम्हाला शंकाच नाही , तसे आम्ही अविश्वास दाखवणार नाही . सर्व पारदर्शी...... अगदी आमच्या शाळेत आपल्या सरकारच्या आदेशाप्रमाणे बसवण्यात येणारी तक्रार पेटी पण पारदर्शक .......
पण शाळेतच का तक्रार पेटी ? ग्रामपंचायत ते zp सर्वत्र लावा होऊन जाऊद्या पंचायत राज भ्रष्टाचार मुक्त...
तक्रार पेटी तलाठी सज्जा, तहसील , कलेक्टर ऑफिस , विभागीय आयुक्त , ते मंत्रालय सर्वत्र का नको ? फक्त शाळेत तक्रारी आहेत का? मंत्री महोदय असे 5 वर्षात कामे काय करतात ? कि महानगरात घरे , भरपूर शेती , मोठ्या महागड्या गाड्या घेतात? त्यांच्या बद्दल प्रत्येक मतदार संघ व खात्याच्या ऑफिस बाहेर तक्रार पेटी अनिवार्य करा . आम्हाला कळू द्या तुंमच्या बद्दल तक्रारी .. आणि त्या तक्रारी ig, लोकपाल, कोर्टाचा प्रतिनिधी व तुम्ही स्वतः cm साहेब पारदर्शी आहेत ना मागती तक्रार पेटी यांच्या समोर खोला. पाहू एकदा मंत्री तरी काय काम करतात ते??
तक्रार पेटी लावायची ना शिक्षण विभाग, महसूल विभाग, पोलीस विभाग या प्रत्येक ठिकाणी लावाच मग बघा कसा तक्रारीचा पाऊस पडतो ते..
साधे उदा देतो आपणास शिक्षण विभागातील क्लार्क त्याचा खिसा गरम नवे भरल्याशिवाय फाईल पुढे सरकवत नाही .. खिसे भरत भरत ती फाईल पुढे जाते नाही तर गहाळ होते आपण तिथे अश्या ऑफिस मध्ये तक्रार पेटी लावणारच नाहीत . कारण प्रत्येक क्लार्क सांगतो मला पुढे हिस्सा द्यावं लागतो पुढे पुढे ते थेट मंत्रालय पर्यंत बोट दाखवतात. सांगतात मंत्री साहेबाना भेटा.. आपली भेट म्हणजे सामान्य नागरिकांसाठी उंबराचे फुल ....
शेतकऱयांच्या तक्रारी ऐकायला एकदा तक्रार पेटी बसवा.. त्यांच्या ऐका एकदा तक्रारी बघू.. बिचाऱ्या गरीब शिक्षक एक रुपयांचा ना भ्रष्टाचार करू शकतो, ना कोणावर अन्याय कारण शाळेत cctv लावलेले आहेत हवं तर दर दिवशी पाहण्यासाठी नवे स्टाफ नेमणूक करा तेवढीच बेकारी पण दूर होईल .
पण एकदा या तक्रार पेटी बाबत कराच विचार
तक्रार पेटी सार्वत्रिक होणार असेल तरच आम्ही प्राथमिक शिक्षक या चांगल्या गोष्टीची सुरुवात करायला तयार आहोत
....आपला पारदर्शी विचारांचा कार्यकर्ता.
No comments :
Post a Comment