Wednesday, 10 May 2017
पिंपळगाव येथील रस्त्याच्या गुणवत्तेचा प्रश्न ऐरणीवर महिन्यापूर्वी केलेल्या रस्त्याचे वाजले बारा
सिद्धनेर्ली (वार्ताहर)
पिंपळगाव खुर्द (ता.कागल) येथील पिंपळगाव फाटा ते चौगले मळा हा रस्ता गेली काही वर्षे रखडला होता, गेल्या काही दिवसापूर्वी हा रस्ता करण्यात आला होतां. त्या मुळे येथील वस्तीवर राहणार्या लोकांचे स्वप्न साकार झाले होते पण हा केलेला रस्ता पावसाळा काढेल ना असी विचारणा होत असतानाच दोन दिवस पडलेल्या पावसाने ह्या रस्त्याविषयी आणि त्याच्या गुणवत्तेविषयी शंका निर्माण झाल्या आहेत .दोन दिवसांपूर्वी पडलेल्या पावसाने हा रस्ता काही ठिकाणी खचला आहे तर काही ठिकाणी रस्ता वाहने जाऊन त्या ठिकाणी काही भाग वर आला आहे त्या मुळे ठेकेदाराने केलेल्या कामाची गुणवत्ता किती आहे हा प्रश्न आता समोर आला आहे. पिंपळगाव फाटा ते चौगले मळा हे सुमारे १ ते दीड किलोमीटर अंतराचा रस्ता पूर्णपणे खाच खळग्यानी व्यापला होता त्या मुळे येथील रस्त्याची मागणी हि नेहमी होत होती, हा रस्ता गेल्या काही दिवसापूर्वी करण्यात आला होता. सुमारे २० लाखापेक्षा अधिक खर्च करून हा रस्ता करण्यात आला होता.हा रस्ता करत असताना मात्र कोणत्याही प्रकारची प्रशासनाने व सार्वजनिक बांधकाम विभागाने दखल न घेतल्यामुळे व त्याच्या गुणवत्तेकडे लक्ष न दिल्या गेल्यामुळे हा रस्ता एका पावसातच खराब झाला आहे त्यामुळे ह्या रस्त्याच्या गुणवत्तेची जबाबदारी नेमकी कोणाची आहे ?ज्यांची जबाबदारी आहे त्यानी का लक्ष दिले नाही ? रस्ता करत असताना स्थानिक पुढाऱ्यांनी त्याकडे का लक्ष दिले नाही ? असे अनेक प्रश्न आता पुढे येत आहेत, तर एका पावसातच रस्ते खराब होणार असतील तर ते का करायचे ? असा संतप्त सवाल नागरीकातून विचारला जात आहे. रस्ताचे भवितव्य काय? लाखो रुपये खर्च करून करण्यात येणारे रस्ते जर अश्या एका पावसाने खराब होणार असतील तर लाखो रुपये खर्च करायचे का? असा सवाल आता पुढे येत आहे . रस्ता करत असताना त्याच्या गुणवत्तेची जबाबदारी ज्याच्यावर असते ते काय करतात? असा प्रश्न आता पुढे येत आहे .तर संबधित ठेकेदार आपल्याला मिळणार्या नफ्यात वाढ करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या मटेरियलच्या गुणवत्तेकडे लक्ष देतो का हे पाहणे गरजेचं आहे. त्याच पद्धतीने अश्या निक्रुष्ट दर्जाच्ये काम करणार्या ठेकेदारावर कारवाई करण्याची गरज आहे.
फोटो – पिंपळगाव येथील महिन्या पूर्वी केलेला रस्त्याची सध्याची अवस्था
Subscribe to:
Post Comments
(
Atom
)

No comments :
Post a Comment