Powered by Blogger.

Wednesday, 10 May 2017

म्हाडा अध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे यांची सिध्दनेर्ली येथे वादळाने नुकसानग्रस्त भागास भेट

No comments :

सिध्दनेर्ली दि 10 येथे वादळी वारे व पावसाने झालेल्या प्रचंड नुकसानीची पाहणी प्रत्यक्ष जागेवर जावुन म्हाडा अध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांनी केली व नुकसानग्रस्तांना धीर दिला मागील चार दिवसापुर्वी झालेल्या वादळी वारेने सिध्दनेर्ली मध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते, पत्रे, खापरी, शेड, घरसामान उडुन गेले होते, अनेकांचे पोल्ट्री शेड पुर्णपणे ढासळले होते, त्यातील पक्षी ही मेले होते,जनावरांचे गोठे पडुन जनावरे जखमी झाली होती, अनेक शेतकरी यांचे धान्य भिजुन नुकसान झाले होते, गावामध्ये जवळपास 47 जणांच्या घराची पडझड होवुन अंदाजे पंधरा लाख रुपयांचे नुकसान झाले आहे, संपूर्ण गावातील 50 ते 60 विद्युत पुरवठाचे खांब मोडुन पडले आहेत त्यामुळे वीजपुरवठा खंडीत झालेला असुन शेती साठी वीजपुरवठा बंद आहे, या संपूर्ण भागाची प्रत्यक्ष पाहणी समरजितसिंह घाटगे यांनी केली व नुकसानग्रस्तांना धीर दिला त्याचप्रमाणे शासकीय स्तरावर जी मदत लागेल ती देणेचे आश्वासन दिले.

No comments :

Post a Comment