Powered by Blogger.

Friday, 5 May 2017

विद्यार्थ्यांनो स्वावलंबी बना व अभ्यास भरपूर करा - नगरसेविका माधुरी लाड

No comments :


कसबा बावडा: प्रतिनिधी

प्राथमिक शिक्षण समिती महानगरपालिका कोल्हापूर च्या,राजर्षी शाहू विद्यामंदिर सेंट्रल नं. 11,मध्ये शाहू संस्कार शिबीर संपन्न झाले, अध्यक्षा नगरसेविका माधुरी लाड यांनी विद्यार्थ्यांनो स्वावलंबी बना व अभ्यास भरपूर करा ,असे मार्गदर्शन केले,
       दीपप्रज्वलन माधुरी लाड , नगरसेवक सुभाष बुचडेसो, नगरसेवक अशोक जाधवसो,विजय माळी,उत्तम कुंभार, अजितकुमार पाटील याच्या हस्ते कारण्यात आले,
      मान्यवरांचे स्वागत मुख्यद्यापक अजितकुमार पाटील यांनी केले,शिबीरमध्ये, प्रार्थना, एरोबिक्स, योगा, चित्रकला, कोलाज, सर्प समज-- गैरसमज,आरोग्य विज्ञान, सूर्यनमस्कार,सूत्र संचालन,स्पर्धा परिक्षा तंत्र मंत्र,यश शास्त्र या विषयावर मार्गदर्शन करण्यात आले.
       सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व वह्या चे मान्यवरांचे हस्ते वितरण करण्यात आले.
प्रमुख उपस्थितीमध्ये शिक्षक संघाचे अध्यक्ष सुनील गणाबावले, मनोहर सरगर, आशा खाडे, निर्मला ठाणगे, वैशाली पाटील,हणमंत माने,देशमुख सर,प्रमोद गायकवाड, दत्ता डांगरे, उत्तम वाईंगडे,इत्यादी होते.
        स्वागत अजितकुमार पाटील यांनी केले,सूत्रसंचालन शिवशम्भो गाटे तर आभार प्राजक्ता कुलकर्णी यांनी मानले, आदर्श शिबिरार्थी म्हणून विनायक कुंभार व प्राजक्ता शिंदे यांनी रांगोळी उत्कृष्ट काढली म्हणून यांचा विशेष सत्कार कारण्यात आला कार्यक्रमासाठी भागातील पालक,विद्यार्थी, उपस्थित होते.

No comments :

Post a Comment