Powered by Blogger.

Tuesday, 20 June 2017

शिक्षकांनी मुलांना जबाबदार नागरिक बनवण्यासाठी सतत प्रयत्नशील रहावे - न्यायाधीश ए.ए.के. शेख

No comments :

कागल/ प्रतिनिधी दि.१९/६/१७

     २००९च्या कायदयानुसार ६ ते १४ वयोगटाच्या मुलांना मोफत शिक्षण देणे अनिवार्य आहे. त्यांच्या कला कौशल्यांना वाव देत त्यांच्या खेळातील नैपुण्य वाढीस लावणेसाठी शिक्षकांनी त्यांना पुढे आणणे गरजेचे बनले आहे. पालक शिक्षक यांनी त्यांना जबाबदार नागरीक बनविण्यासाठी सातत्याने शिक्षणाच्या प्रवाहात ते राहतील  यासाठी प्रयत्नशील राहावे. असे मत दिवाणी न्यायाधीश ए.ए.के. शेख यांनी व्यक्त केले. ते श्री शाहू हायस्कूल कागल मध्ये बालमजूरी विरोधी दिना निमित्त आयोजित कार्यक्रम  प्रसंगी बोलत होते. अध्यक्षस्थानी प्राचार्य महावीर रुग्गे होते.
     व्याख्याते अॅड. एस.के. पोटले म्हणाले की, वीटभट्टी, ऊसतोड, हॉटेल्स आदी क्षेत्रात बाल कामगार कार्यरत असतात . त्यास विरोध झाला पाहीजे.पालकांनी आपली१४ वर्ष वयोगटातील मुलांना कामास न पाठविणे  व मालकांनी कामास न घेणे निर्णय घेतला तरच बालक  कामगार होणेचे थांबतील. प्रथमतः मान्यवरांच्या हस्ते सरस्वती देवीची प्रतिमा पूजन करण्यात आले.
     प्राचार्य महावीर रूग्गे म्हणाले की , गरीब मुलांना शालोपयोगी सर्व वस्तू पोषाख, वाहतूक व्यवस्था शालेय व्यवस्थापनाकडून मोफत दिल्या जातात. त्यामुळे सर्व स्तरातील मुले शिक्षण प्रवाहात आहेत. त्यामुळे बालमजुरीकडे लहान वयातील मुले वळणे प्रश्नच येत नाही. स्वागत पर्यवेक्षिका एस.ए. कुलकर्णी यांनी केले तर सूत्रसंचालन महेश शेडबाळे यांनी केले. आभार उपमुख्याध्यापक आर.जी.देशमाने यांनी केले.
           फोटो - श्री शाहू हायस्कूलमध्ये बोलतांना दिवाणी न्यायाधिश ए.ए.के. शेख बोलतांना व इतर मान्यवर
( छाया सुधाकर निर्मळे)

No comments :

Post a Comment