Powered by Blogger.

Sunday, 18 June 2017

विद्या मंदिर बोळावी शाळेस मुंबईच्या फँड्री फाउंडेशनतर्फे दोन लॅपटॉप, एक प्रोजेक्टर, साउंड बॉक्स आणि पहिली ते दहावी सॉफ्टवेअर ई लर्निंग सेट प्रदान

No comments :

मुरगुड प्रतिनिधी
समीर कटके
       कागल तालुक्यातील दुर्गम व डोंगराळ भागातील विद्या मंदिर बोळावी या शाळेस मुंबई स्थित फँड्री फाउंडेशन यांच्या तर्फे दोन लॅपटॉप, एक प्रोजेक्टर, साउंड बॉक्स आणि इयत्ता पहिली ते दहावी पर्यंतचा सर्व अभ्यासक्रम असणारे सॉफ्टवेअर असा परिपूर्ण ई लर्निंग सेट प्रदान करण्यात आला. शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मारुती तोरसे, मुख्याध्यापक मोहन पाटील, शाळेचा स्टाफ व व्यवस्थापन समितीचे सदस्य यांच्याकडे समारंभपूर्वक प्रदान करण्यात आला.
       या प्रसंगी फँड्री फौंडेशनच्या प्रमुख श्रीमती संचिता धनावडे म्हणाल्या बोळावी सारख्या दुर्गम भागात असूनही शाळेने राबवलेले शैक्षणिक उपक्रम पाहून आम्ही शाळेच्या अक्षरशः प्रेमात पडलो  आणि शाळा दत्तक घेण्याचा निर्णय घेतला. बोळावी मधील शाळा व विद्यार्थीच नव्हे तर तर गावासाठी सुद्धा पर्यावरण संरक्षण, पाणी,स्वच्छता व इतर मूलभूत सुविधा पुरवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू असेही त्या म्हणाल्या. या वेळी फौंडेशनच्या अपर्णा सुनील, अश्विनी गोपुगडे, बिना कामत आदी उपस्थित होत्या.
      हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी फँड्री फौंडेशन मुंबईशी सतत संपर्क करण्याचे काम रोटरीचे मनीष देशपांडे( कोल्हापूर) आणि टी एस गडकरी यांनी केले त्यांच्या बद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.
        प्रास्ताविक नरेंद्र भारले यांनी केले तर आभार बटू जाधव यांनी मानले.यावेळी श्रीकांत गायकवाड, संतोष मेळवंकी, बाजीराव रक्ताडे, वाकोजी खेडेकर तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे संजय पाटील,श्रीकांत खांडेकर,अशोक पाटील, गणपती सुतार,रघुनाथ साळोखे, रुपाली पाटील, सरिता पाटील, कल्पना कांबळे,सुरेखा पागम, सुनीता हासुरकर, प्रकाश ढेंगे यांच्यासह विद्यार्थी, पालक, ग्रामस्थ उपस्थित होते.

फोटो : विद्यामंदिर बोळावी या जि प मराठी शाळेस मुंबई येथील फँड्री फौंडेशनच्या वतीने ई लर्निंग सेट प्रदान करण्यात आला. प्रसंगी संचिता धनावडे, अपर्णा सुनील,अश्विनी गोपुगडे, मनीष देशपांडे, टी एस गडकरी आदी

No comments :

Post a Comment