Powered by Blogger.

Sunday, 18 June 2017

अंबाबाई पुजारी हटाव - कोल्हापूर अंबाबाई मंदिरात जोरदार आंदोलन

No comments :

घागरा-चोली वस्त्र नेसवून पूजा बांधल्याने भाविकांच्या भावना दुखावल्या असल्याच्या भूमिकेतून गेले काही दिवस विविध पक्ष, संघटनांनी आंदोलन सुरू केले आहे. 

अंबाबाई मूर्तीची चुकीचा वज्रलेप करुन हेळसांड करणाऱ्या आणि राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचा अवमान करणाऱ्या पुजाऱ्यांना मंदिरातून हटवा, या मागणीसाठी आज शिवसेनेसह विविध पक्ष व संघटनांच्या कार्यकर्त्यांनी मंदिर परिसरात जोरदार घोषणा देत आंदोलन केले.
     यावेळी अंबाबाईच्या नावानं चांगभलं', 'अंबा माता की जय', 'आता एकच मागणी- हटाव पुजारी' अशा घोषणा देत आंदोलकांनी पुजारी हटावची आक्रमक भूमिका घेतली आहे.

मंदिरात भाविकांच्या देणग्या, भेटवस्तू, सोन्याचे दागिने यावर पुजारी मंडळींकडून हक्क सांगितला जातो व देवस्थानला काहीही मिळत नाही याविरुद्ध भाविकांमध्ये तीव्र नाराजी असुन
आंदोलन तीव्र करण्याचा निर्णय काल झालेल्या संयुक्त बैठकीत झाला.
       पण अजूनही जिल्हा प्रशासनाने याबाबतीत काहीही ठोस निर्णय घेतला नाही म्हणून यापुढे पुजाऱ्यांना मंदिरात न सोडण्याचा निर्धार आंदोलकांनी केला आहे.

No comments :

Post a Comment