Powered by Blogger.

Sunday, 18 June 2017

मोहन सातपुते यांचा वसुंधरा प्रेरणा राज्यस्तरीय युवा भरारी पुरस्काराने सन्मान

No comments :

हेरले/ प्रतिनिधी दि. १५/६/१७

गोकुळ शिरगाव ता. करवीर येथील युवा ग्रामीण विकास संस्था ,एच .आय. व्ही /एड्स
स्थलांतरीत कामगार लक्षगट हस्तक्षेप प्रकल्पाचे प्रकल्प व्यवस्थापक  मोहन गणपती सातपुते यांना वसुंधरा सामाजिक सेवाभावी संस्था, इचलकरंजी या संस्थेच्या वतीने  वसुंधरा प्रेरणा राज्यस्तरीय युवा भरारी पुरस्कार  प्रदान करण्यात आला .
गोकुळ शिरगाव व कागल फाईव्ह स्टार एमआयडीसी येथे एड्स जनजागृती कार्य सुरु आहे .गेली दहा वर्षे सातत्याने सातपुते एच. आय .व्ही/एड्स जनजागृतीसाठी 
कार्य करत आहेत. त्यांच्या या उत्कृष्ट समाजकार्याची दखल घेऊन युवा भरारी पुरस्कार आम. सुजित मिणचेकर ,सांगली जिल्हा परिषद अध्यक्ष संग्रामभाऊ देशमुख, नगरसेविका सायली लायकर , विजय तोडकर,बचाराम तोडकर यांच्या उपस्थितीत  सन्मानपत्र, शिल्ड, पुष्पगुच्छ देऊन घोरपडे नाट्यगृह, इचलकरंजी येथे सन्मानित करण्यात आले.

त्यांना मार्गदर्शन संस्थेचे प्रेरणास्थान आम. प्रकाश आबिटकर ,संस्थेचे मार्गदर्शक माजी जि .प. सदस्य प्राचार्य अर्जुन आबिटकर,अध्यक्ष अजित आबिटकर,प्रकल्प संचालक अतुल निकम (सरकार),. त्याच बरोबर युवा ग्रामीण विकास संस्था कर्मचारी सागर घोडके, समुपदेशक महेश कांबळे,सामाजिक कार्यकर्ते प्रदीप आवळे,सचिन आवळे,रणजीत शिंदे,गणेश बारटक्के, हालसिध्दनाथ कांबळे,मुकेश माने,प्रल्हाद कांबळे, सौ दिपाली सातपुते यांचे सहकार्य लाभले.

फोटो  :-  एड्स जनजागृती कार्याबद्दल मोहन सातपुते यांना राज्यस्तरीय युवा भरारी पुरस्कार प्रदान करताना आम. सुजित मिणचेकर,सांगली जि प अध्यक्ष संग्रामभाऊ देशमुख,विजय तोडकर,नगरसेविका सायली लायकर आदी

No comments :

Post a Comment