Wednesday, 21 June 2017
तंत्रशिक्षणाचा बाजार "marathi engeeniering education market cheat"
राज्यात सध्या इंजिनीयरिंगची वाट लागत असल्याचे चित्र आहे , मागील वर्षी इंजिनियरिंगच्या सुमारे ५७ हजार जागा रिक्त राहिल्या, बहुतेक कॉलेजमध्ये ‘एआयसीटीई’च्या निकषांचे पालन होत नसल्याचे एआयसीटीई व डीटीईच्याच चौकशीत आढळून आले आहे. तरीही अशी तकलादू कॉलेज बंद केली जात नाहीत कदाचित तपासणी पथकाला खुश करण्याचा फंडा कॉलेजचालकांना चांगलाच पाठ असावा .अश्या कॉलेजमध्ये अपुरी जागा , अपात्र शिक्षक वर्ग ,नवीन, अननुभवी कंत्राटी शिक्षक, विदयार्थी प्रवेश व्हावे यासाठी शिक्षकांना कामाला लावणे ,१०० टक्के प्लेसमेंट्सचे खोटे दावे करणे अश्या धनदांडग्या आणि राजकारण्यांच्या कॉलेजांवरती प्रत्यक्षात कोणती कारवाई केली जात नसल्याचे चित्र आहे .राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री व त्यांचे खाते हेही गंभीर नसल्यामुळे अननुभवी व कमी पगारावर राबणाऱ्या अपात्र शिक्षकांच्या आधाराने प्रवेशप्राप्त विद्यार्थ्यांचे भविष्य नक्की कसे घडणार आहे, याचे उत्तर कुणाकडेच नाही.सरकारी कॉलेजमध्ये कमी मार्कांमुळे प्रवेश मिळवण्यास अपयशी ठरलेला विद्यार्थी लाखो रुपये मोजून अश्या कॉलेजमध्ये प्रवेश घेऊन फसतो , येथे शिक्षकांनाच काही येत नाही तर ते विदयार्थ्यांना काय शिकवणार आणि असे शिक्षण घेतलेले इंजिनीअर जेंव्हा प्रत्यक्षात व्यावसायिक कसोटीवर अपयशी ठरतात तेंव्हा झक मारली आणि इंजिनियर झालो असे वाटते माझ्या माहितीत तर असा एक बी ई झालेला सिविल इंजिनीअर आहे कि ज्याला पाच ते सात हजारापेक्षा जास्त पगाराची नोकरीची ऑफरचं येत नाही शेवटी वैतागून साडी दुकानात कामाला जात आहे १५ हजार रुपये पगारावर मग अश्या व्यावसायिक तंत्र शिक्षणाचा उपयोगच काय , हल्लीचे कॉलेजेस म्हणजे इंजिनियर तयार करण्याचे कारखानेच झाले आहेत त्यांना शिक्षणाच्या गुणवत्तेशी काडीचेही देणे घेणे नाही ,त्यांनी फक्त तंत्र शिक्षणाचा बाजारच मांडला आहे.संपादक बाबासो जाधव.
Subscribe to:
Post Comments
(
Atom
)
No comments :
Post a Comment