Powered by Blogger.

Wednesday, 21 June 2017

योग म्हणजे जीवन जगण्याची कला -- प्राजक्ता शिंदे

No comments :

.
प्राथमिक शिक्षण समिती, कोल्हापूर, संचलित,
राजर्षि शाहू विद्यामंदिर सेंट्रल स्कुल नंबर 11,कसबा बावडा,कोल्हापूर मध्ये,21 जून हा जागतिक योग दिन साजरा करण्यात आला. उदघाटन प्रसंगी शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा प्राजक्ता शिंदे यांनी,"योगासनाने जीवन समृद्ध होते व असाध्य रोग नाहीसे होतात",असे प्रतिपादन केले.प्रसंगी रोपट्यास पाणी घालून उपाध्यक्षा पल्लवी पाटील,मुख्याध्यापक अजितकुमार पाटील,शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य रमेश सुतार,वैशाली कोरवी,योगशिक्षक सुशील जाधव, जेष्ठ शिक्षक उत्तम कुंभार यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले. कार्यक्रमाचे स्वागत प्राजक्ता कुलकर्णी यांनी केले. प्रास्ताविक आसमा तांबोळी यांनी केले. कार्यक्रमाप्रसंगी शाळेचे केंद्रमुख्याध्यापक अजितकुमार पाटील यांनी विद्यार्थ्यांनी दररोज योगासन केल्यामुळे मनाची एकाग्रता वाढते व अभ्यास चांगला होतो, असा प्रतिपादन केले.कार्यक्रमाप्रसंगी अरुण सूनगार,मंगल मोरे, हेमंतकुमार पाटोळे,कल्पना पाटील, गायत्री प्रभावले, सुखदा वेलणकर,रजनी सुतार, जे. बी. सपाटे, सुजाता आवटी व इतर मान्यवर पालक उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार शिवशंभू गाटे यांनी मानले.

No comments :

Post a Comment