Powered by Blogger.

Sunday, 4 June 2017

दै.पुढारी पत्रकार कृष्णात हिरवे यांचा ग्रुप अॉफ मिडिया वतीने पत्रकार रत्न पुरस्कार देऊन गौरव

No comments :

दै.पुढारी चे पत्रकार व क्राईम डायरीचे पन्हाळा, शाहूवाडी, मलकापूर प्रतिनिधी मा.कृष्णात बी. हिरवे रा.पैजारवाडी याना ग्रुप ऑफ मीडिया च्या वतीने देण्यात येणारा राज्यस्तरीय 2017 चा पत्रकार रत्न पुरस्कार कोल्हापूरच्या महापौर मा.हसीना फरास यांच्या हस्ते देऊन सन्मानित करण्यात आले.

ग्रुप ऑफ मिडीया चा वर्धापन दिन सोहळ| कार्यक्रम आज शाहू स्मारक  भवन कोल्हापूर या ठिकाणी पार पडला  या कार्यक्रमात महाराष्ट्र राज्यातील विविध क्षेत्रामध्ये उत्तम कामगिरी व समाजसेवा केलेल्या अनेक मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.  हा कार्यक्रम लोकप्रतिनिधी मान्यवर , ग्रुप ऑफ मिडीया चे संस्थापक अध्यक्ष मा बाबासो जाधव साहेब , सागर पाटील  पश्चिम महाराष्ट्र विभाग प्रमुख ,ज्ञानराज पाटील मुख्य प्रतिनिधी क्राईम डायरी व सर्व पत्रकार बंधू , ग्रुप ऑफ मिडीया चे सर्व सदस्य पत्रकार बंधू , ईतर मान्यवर पत्रकार  व ज्येष्ठ नागरिक यांच्या उपस्थित  मोठया उत्साहात  हा कार्यक्रम पार पडला.

No comments :

Post a Comment