Sunday, 4 June 2017
मुजुमदार, शेटे व लोहार यांचा ग्रुप अॉफ मिडिया तर्फे शैक्षणिक क्षेत्रातील विशेष पुरस्कार देऊन सन्मान
ग्रुप ऑफ मिडीयाचा वर्धापन दिन सोहळा कार्यक्रम आज शाहू स्मारक भवन कोल्हापूर या ठिकाणी पार पडला. कोल्हापूरच्या महापौर हसिना फरास यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमात महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष मा. अरूण मुजुमदार सर यांना आदर्श व्यक्तीमत्व पुरस्कार सन्मान पत्र व सन्मान चिन्ह देऊन गौरव करण्यात आला , शिक्षक सेनेचे जिल्हा कार्याध्यक्ष व स्टार अॅकॅडमीचे संस्थापक अध्यक्ष मा.दिपक शेटे सर यांना ज्ञानशक्ती पुरस्कार सन्मान पत्र व सन्मान चिन्ह देऊन गौरव करण्यात आला, शिक्षक सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष व क्राईम डायरी , शांती टाईम्स चे शिरोळ तालुका प्रतिनिधी मा. सतिश लोहार सर यांना विद्यासेवा पुरस्कार सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला , तसेच विविध क्षेत्रामध्ये उत्तम कामगिरी व समाजसेवा केलेल्या अनेक मान्यवरांचा सत्कार या कार्यक्रमात करण्यात आला. हा कार्यक्रम लोकप्रतिनिधी मान्यवर , ग्रुप ऑफ मिडीया चे संस्थापक अध्यक्ष मा. बाबासो जाधव साहेब , सागर पाटील पश्चिम महाराष्ट्र विभाग प्रमुख , तसेच क्राईम डायरी मुख्य प्रतिनिधी ज्ञानराज पाटील आणि सर्व पत्रकार बंधू , ग्रुप ऑफ मिडीया चे सर्व सदस्य पत्रकार बंधू , इतर मान्यवर पत्रकार व ज्येष्ठ नागरिक यांच्या उपस्थित मोठया उत्साहात हा कार्यक्रम पार पडला.
No comments :
Post a Comment