Monday, 5 June 2017
श्रीराम सोसायटीच्या नविन बहुउद्देशीय हॉलचे डॉ. डी.वाय.पाटील यांच्या हस्ते उद्घाटन
आशिया खंडात नावाजलेली व कसबा बावड्याचा मानबिंदू असलेल्या श्रीराम सहकारी सोसायटी या संस्थेच्या स्थापनेला नुकतीच 79 वर्ष पूर्ण झाली आहेत . कोल्हापूर जिल्हा व महाराष्ट्रातील अग्रेसर असलेल्या या संस्थेने नेहमीच सभासदांसाठी अनेक नाविन्यपूर्ण व लोकोपयोगी योजना राबविल्या आहेत ..
यातील महत्वाची योजना म्हणजे संस्थेने जुन्या मंगल कार्यालय हॉल च्या ठिकाणी भव्य आणि प्रशस्त असा सर्व सोयीनियुक्त नवीन हॉल बांधला आहे. श्रीराम संस्थेचे माजी चेअरमन आदरणीय पद्मश्री डॉ.डी. वाय. पाटील (दादा) यांचे शुभहस्ते सोसायटीच्या नवीन हाॅलचा उद्घाटन समारंभ संपन्न झाला . या प्रसंगी आ. हसन मुश्रीफ, डॉ
संजय डी पाटील, आ. सतेज पाटील, श्री संजय मंडलिक, ऋतुराज पाटील, चेअरमन प्रमोद पाटील, सर्व संचालक आणि सभासद, ग्रामस्थ उपस्थित होते. या नव्या हॉलमुळे सभासद आणि कसबा बावडा परिसरातील लोकांसाठी चांगली सुविधा उपलब्ध झाली आहे, त्यामुळे नागरिकांनी या कार्यक्रमाला उस्फूर्तपणे हजेरी लावली व शुभेच्छा दिल्या.
No comments :
Post a Comment