Sunday, 9 July 2017
महाराष्ट्र पत्रकार संघ शिवरत्न कला महोत्सवात आ. बच्चू कडू यांच्या हस्ते विविध मान्यवरांचा सन्मान
कोल्हापूर प्रतिनिधी
कोल्हापूर येथील आचार्य विद्यानंद सांस्कृतिक भवन येथे काल महाराष्ट्र पत्रकार संघ शिवरत्न कला महोत्सव 2017 हा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी शिवरत्न फौंडेशनच्या वतीने सामाजिक, राजकीय, आर्थिक, सांस्कृतिक, प्रसारमाध्यमे, व्यावसायिक, कला, क्रीडा, नाट्य, सहकार आदि विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करून आपल्या कार्याचा ठसा उमटविला आहे अशा व्यक्तींना सन्मानित करण्यात आले.
या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून आमदार बच्चूभाऊ कडू ( संस्थापक अध्यक्ष - प्रहार संघटना) व प्रमुख पाहुणे म्हणून विलासराव कोळेकर ( अध्यक्ष महाराष्ट्र पत्रकार संघ) तसेच अनेक मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमाला उपस्थित क्राइम डायरी व साप्ताहिक शांती टाईम्स चे संपादक बाबासो जाधव यांना आ. बच्चू कडू यांच्या हस्ते मानचिन्ह देउन गौरविण्यात आले तसेच आ. बच्चू कडू यांनी बाबासो जाधव यांच्याशी विविध क्षेत्रातील घडामोडींवर चर्चा केली व गत आठवणींना उजाळा दिला.
No comments :
Post a Comment