Sunday, 9 July 2017
रोटरी क्लब आॅफ इचलकरंजी, रोटरी क्लब आॅफ इचलकरंजी अॅन्स आणि वंदे फौंडेशन,इचलकरंजी यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र मध्ये प्रथमच डाॅ. ए.पी.जे.अब्दुल कलाम संशोधन केंद्राची स्थापना
हेरले/ प्रतिनिधी दि. ९/७/१६
रोटरी क्लब आॅफ इचलकरंजी, रोटरी क्लब आॅफ इचलकरंजी अॅन्स आणि वंदे फौंडेशन,इचलकरंजी यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र मध्ये प्रथमच डाॅ. ए.पी.जे.अब्दुल कलाम संशोधन केंद्राची स्थापना आज इचलकरंजीतील डॅा.राधाकृष्णन विद्या मंदिर क्रं.२ येथे करणेत आली.
दर १० शाळांना एकत्र घेवुन १ केंद्र अशी या केंद्राची संकल्पना आहे.
१००० प्रयोगांची प्रयोगशाळा,अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि दर रविवारची कौशल्याची शाळा असा अनोखा समारोह पार पडला.या समारोहासाठी रोटरी क्लबचे DG रो.आनंदजी कुलकर्णी , रोटरी क्लब आॅफ इचलकरंजीचे अध्यक्ष रो.मनिषजी मुनोत,रोटरी क्लब आॅफ इचलकरंजी अॅन्सच्या अध्यक्षा मा.मनाली मुनोत,मा.महेंद्रजी मुथा मा.किरनजी दंडगे,मा.हीराचंदजी बरगाले,मा.अशोक माली ,मा.शुभांगी माळी ,मा.वसिम गफारी,मा.गौतम बागवडे,श्री.धनेश बोरा उपस्थित होते . या समारोहाचे प्रास्ताविक लक्ष्मण कांबरे यांनी केले , सूत्रसंचालन कु.अर्चना जाधव यांनी केले. सर्व उपस्थित मुलांना व पालकांना शुभेच्छा मुख्याध्यापक शितल लडगे यांनी दिल्या. आभार मिनाक्षी तगडी यांनी मानले.
No comments :
Post a Comment