Saturday, 15 July 2017
शहरांच्या सामाजिक व शैक्षणिक प्रगतीत यादव कुटूंबीयांचा सिंहाचा वाटा - जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांचे विजयवंत महोत्सव उद्घाटनप्रसंगी कौतुकोद्गार
पेठवडगाव (प्रतिनिधी).
समाजकार्याची व शिक्षण़क्षेत्राची परंपरा यादव कुटूंबाकडे आहे.यामाध्यमातून शहरांच्या सामाजिक व शैक्षणिक प्रगतीत यांचा सिंहाचा वाटा आहे असे प्रतिपादन जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांनी केले.
विजयसिंह यादव प्रतिष्ठान पुरस्कृत शाहु शिक्षण प्रसारक सेवा मंडळाच्यावतीने आयोजित विजयवंत महोत्सव 2017 च्या उदघाटनप्रसंगी ते बोलत होते.अध्यक्षस्थानी माजी पोलिस आयुक्त गुलाबराव पोळ होते.प्रमुख उपस्थितीत उपाध्यक्षा विजयादेवी यादव,सचिव विदयाताई पोळ,तहसिलदार वैशाली राजमाने,मुख्याधिकारी अतूल पाटील,पंचायत समिती सदस्य लक्ष्मण अवघडे,नगरसेविका अनिता चव्हाण,संगिता मिरजकर,राजकुमार पोळ आदी उपस्थित होते.
महोत्सवाची सुरूवात विजयसिंह यादव महाविदयालयातून ग्रंथदिंडीने झाली.ग्रंथदिडीचे पुजन नगरपालिका चैकात नगराध्यक्ष मोहनलाल माळी यांनी केले.
पुढे बोलताना जिल्हाधिकरी सुभेदार म्हणाले,विद्यार्थ्यांच्या मनाचा कल शोधून त्यांच्या आवडीचे शिक्षण दयावे.तरच त्यांचा सर्वागिण विकास होवू शकतो.सध्या शिक्षणांच्या हक्काबरोबर योग्य शिक्षण देणे काळाची गरज आहे.जीवनात यशस्वी होण्यासाठी स्वतःला दिलेले काम उत्कृष्टपणे करावे.प्रचंड आत्मविश्वास,कष्ट, चिकाटी व खिलाडूवृत्ती जोपासून विदयाथ्र्यांनी आवडीच्या क्षेत्रात सर्वोत्कृष्ट बनावे.
अध्यक्षस्थानावरून बोलताना गुलाबराव पोळ म्हणाले,वडगाव परिसरांतील शैक्षणिक संस्थामधील विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देणे,जिद्द,आत्मविश्वास निर्माण करणे तसेच संस्थेतील गुणवंत कर्मचा-यांचा गुणगौरव करण्याकरिता विजयवंत महोत्सवाचे आयोजन केले आहे. शिक्षकांनी सामाजिक बांधिलकी जपत जबाबदारीने आदर्श विदयार्थी घडवावा. शासनाची पंतप्रधान कौशल्य योजना सुरू असून त्यांचा लाभ पालकांनी घ्यावा असे आवाहन त्यांनी केले.
प्रास्ताविक डाॅ.सरदार जाधव यांनी केले.सुत्रसंचालन प्रशांत भोरे यांनी तर डाॅ.सचिन पवार यांनी आभार मानले.कार्यक्रमास प्राचार्य शिवाजीराव पाटील,प्राचार्य अधिकराव निकम,स्नेहल नार्वेकर,शोभा देसावळे,श्रृती महाजन,के.के.कोळी,मनिषा पोळ,पी.बी.पाटील,अभिजित गायकवाड,रणजित यादव,डाॅ.माधवी सावंत,सुनिल हुक्केरी,राजन शेटे,आनंदराव म्हेत्रस,मन्सुर मोमीन,सचिन चव्हाण आदीसह शिक्षक,शिक्षकेत्तर कर्मचारी,पालक,विदयार्थी उपस्थित होते.
--------------------------
फोटो - 1) पेठवडगाव येथे विजयवंत महोत्सव 2017च्या उदघाटनप्रसंगी बोलताना जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार.व्यासपीठावर तहसिलदार वैशाली राजमाने,सचिव विदयाताई पोळ,अध्यक्ष गुलाबराव पोळ,मुख्याधिकारी अतूल पाटील आदीसह मान्यवर.
2) पेठवडगाव विजयवंत महोत्सवात ग्रंथदिंडीचे पुजन करताना नगराध्यक्ष मोहनलाल माळी,अध्यक्ष गुलाबराव पोळ,सचिव विदयाताई पोळ,प्राचार्य अधिकराव निकम,राजकुमार पोळ आदीसह मान्यवर.समोर उपस्थित जनसमुदाय
(छाया.श्रेया फोटो,भादोले)
No comments :
Post a Comment