Powered by Blogger.

Sunday, 16 July 2017

विद्यार्थ्यांनी सखोल अभ्यास करावा -अजितकुमार पाटील यांचे स्कॉलरशिप कार्यशाळेत प्रतिपादन

2 comments :

कोल्हापूर दि:15 ,कोल्हापूर प्राथमिक शिक्षण समिती,महानगरपालिका, संचलित
राजर्षी शाहू विद्यामंदिर, शाळा क्र 11 मध्ये,इयत्ता 5 वी स्कॉलरशिप कार्यशाळा संपन्न झाली,कार्यशाळेचे उदघाटन, शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा सौ.प्राजक्ता शिंदे ,मुख्याध्यापक अजितकुमार पाटील,जेष्ठ शिक्षक उत्तम कुंभार, सुशील जाधव यांच्या उपस्थितीत झाले.कार्यशाळेचे स्वागत श्रद्धा दाभाडे यांनी केले.तर कार्यशाळेचे हेतू व उद्देश आसमा तांबोळी यांनी सांगितले. कार्यशाळेमध्ये सुशील जाधव, उत्तम कुंभार, आसमा तांबोळी, यांनी विद्यार्थी व पालक यांनी अभ्यास व नियोजन कसे करावे ,गणित,बुद्धिमत्ता,मराठी या विषयी घटकनिहाय  विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.मुख्याध्यापक अजितकुमार पाटील यांनी विद्यार्थ्यांना अभ्यास करताना मुद्देसुद नोंदी कसे करावे व सखोल अभ्यास कसा  करावा ,वेळेचे नियोजन,स्पर्धा परिक्षा व अभ्यासक्रम, यांचे संपूर्ण महत्व समजावून  सांगितले.जीवनात यशस्वी होण्यासाठी सखोल अभ्यास महत्वाचा असतो असे प्रतिपादन केले. गाटे सर यांनी शासकीय परिक्षा व इतर स्पर्धा यांचे मार्गदर्शन केले.कार्यशाळेमध्ये मयुरी कांबळे,निशिका शिंदे,श्रुती चौगले,ऋतुराज कोरवी,या विद्यार्थ्यांनी अभ्यासाबद्दल मते मांडली.कार्यशाळेमध्ये पालक,शिक्षक,उपस्थित होते.कार्यशाळेमध्ये हेमंतकुमार पाटोळे,मंगल मोरे,भक्ती चव्हाण, यांनी विशेष सहकार्य केले.सादीया शेख हिने उपस्थित मान्यवरांचे आभार मानले.

2 comments :