Powered by Blogger.

Monday, 17 July 2017

एकोंडी रस्त्याची दुर्दशा - मुरुमाच्या सहायाने खड्डे भरण्याचा प्रशासनाचा केविलवाणा प्रयत्न

No comments :

सिद्धनेर्ली (वार्ताहर) रवींद्र पाटील

येथील नदीकीनार्या वरून एकोंडी कडे जाणार्‍या रस्त्याची मोठ्या प्रमाणावर दुर्दशा झाली असून नदीकिनारा ते एकोंडी गावात प्रवेश करेपर्यंत रस्ताच्या मधोमध मोठ्या प्रमाणावर खाच- खळग्यांनी आपले साम्राज्य  निर्माण केले आहे. गेली कित्येक वर्षे ह्या रस्त्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष असल्याचे दिसून येत आहे.त्या मुळे ह्या रस्त्यावरून जाताना प्रवाश्यांना तारेवरची कसरत करावी लागते . त्याच बरोबर एकोंडी मधील शालेय विद्यार्थी सिद्धनेर्ली येथे शिक्षणासाठी येतात त्यांनाही ह्या रस्त्यावरील   खाच- खळग्यांचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. पावसाळा आला कि सिद्धनेर्ली परिसरातील काही रस्त्याची परिस्तिथी अत्यंत दयनीय होते. एका पावसातच येथील रस्त्याच्या दर्जाच्या बाबत प्रश्न चिन्ह निर्माण होतो. यात भरीत भर म्हणून याच खड्यामध्ये मुरूम टाकून खड्डे भरण्याचा केविलवाणा प्रयत्न केला जातो पण याचा नाहक त्रास प्रवाश्यांना करावा लागतो कारण पावसाचे पाणी गेल्यामुळे तेथे मोठ्या प्रमाणावर चिखलाचे प्रमाण वाढल्यामुळे दुचाकी घसरून अपघाताचे प्रमाण वाढले आहे तसेच एखादी गाडी गेली कि त्याच्या पाठीमागे असणार्या लोकांच्या अंगावर चिखल उडाल्या कारणाने वादाचे प्रसंग काही वेळेला निर्माण होताना दिसतात. पावसाळा आला कि या रस्त्याच्या गरजेविषयी प्रशासनाला जाग येत असल्यामुळे आणि पावसाळ्यातच ह्या रस्त्याची डागडुजी करण्याच्या ह्या केविलवाण्या प्रयत्नांना मात्र नागरिकामधून मात्र नापसंती मिळत असून संतापाची भावांना सध्या दिसत आहे.

फोटो – एकोंडी येथील रस्त्याची झालेली दुर्दशा (छाया –रवींद्र पाटील)

No comments :

Post a Comment