Sunday, 16 July 2017
विद्यार्थ्यांनी सखोल अभ्यास करावा -अजितकुमार पाटील यांचे स्कॉलरशिप कार्यशाळेत प्रतिपादन
कोल्हापूर दि:15 ,कोल्हापूर प्राथमिक शिक्षण समिती,महानगरपालिका, संचलित
राजर्षी शाहू विद्यामंदिर, शाळा क्र 11 मध्ये,इयत्ता 5 वी स्कॉलरशिप कार्यशाळा संपन्न झाली,कार्यशाळेचे उदघाटन, शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा सौ.प्राजक्ता शिंदे ,मुख्याध्यापक अजितकुमार पाटील,जेष्ठ शिक्षक उत्तम कुंभार, सुशील जाधव यांच्या उपस्थितीत झाले.कार्यशाळेचे स्वागत श्रद्धा दाभाडे यांनी केले.तर कार्यशाळेचे हेतू व उद्देश आसमा तांबोळी यांनी सांगितले. कार्यशाळेमध्ये सुशील जाधव, उत्तम कुंभार, आसमा तांबोळी, यांनी विद्यार्थी व पालक यांनी अभ्यास व नियोजन कसे करावे ,गणित,बुद्धिमत्ता,मराठी या विषयी घटकनिहाय विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.मुख्याध्यापक अजितकुमार पाटील यांनी विद्यार्थ्यांना अभ्यास करताना मुद्देसुद नोंदी कसे करावे व सखोल अभ्यास कसा करावा ,वेळेचे नियोजन,स्पर्धा परिक्षा व अभ्यासक्रम, यांचे संपूर्ण महत्व समजावून सांगितले.जीवनात यशस्वी होण्यासाठी सखोल अभ्यास महत्वाचा असतो असे प्रतिपादन केले. गाटे सर यांनी शासकीय परिक्षा व इतर स्पर्धा यांचे मार्गदर्शन केले.कार्यशाळेमध्ये मयुरी कांबळे,निशिका शिंदे,श्रुती चौगले,ऋतुराज कोरवी,या विद्यार्थ्यांनी अभ्यासाबद्दल मते मांडली.कार्यशाळेमध्ये पालक,शिक्षक,उपस्थित होते.कार्यशाळेमध्ये हेमंतकुमार पाटोळे,मंगल मोरे,भक्ती चव्हाण, यांनी विशेष सहकार्य केले.सादीया शेख हिने उपस्थित मान्यवरांचे आभार मानले.
Chhan sir
ReplyDeleteCongratulations. sir
ReplyDelete