Powered by Blogger.

Wednesday, 12 July 2017

पेठ वडगाव येथील श्री शाहू शिक्षण प्रसारक सेवा मंडळातर्फे विजयवंत महोत्सव २०१७ चे आयोजन

No comments :
 (प्रतिनिधी) :
     पेठ वडगाव येथील श्री शाहू शिक्षण प्रसारक सेवा मंडळातर्फे  प्रतिवर्षाप्रमाणे विजयवंत महोत्सव २०१७ चे आयोजन दि.१४ ते १८ जुलै २०१७ दरम्यान केले आहे.
वडगाव पंचक्रोशीतील विविध शाळांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण  व्यक्तिमत्व विकासात योगदान देता यावे. परस्पर शैक्षणिक संवाद घडून यावा या उद्देशाने या महोत्सवाचे आयोजन करण्यात येत असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष  गुलाबराव पोळ व संस्थेच्या सचिव सौ विद्या गुलाबराव पोळ यांनी पत्रकार परिषदेत दिली.
दि .१४ रोजी अविनाश सुभेदार मा.जिल्हाधिकारी ,कोल्हापूर यांच्या हस्ते या महोत्सवाचे उदघाटन होणार असून दि.१८ रोजी मा.संजय मोहिते डी एस पी कोल्हापूर  व एम के गोंधळी शिक्षण उपसंचालक यांच्या अध्यक्षतेखाली या महोत्सवाची सांगता होणार आहे , दरम्यानच्या काळात निबंध स्पर्धा ,चित्रकला स्पर्धा ,वक्तृत्व स्पर्धा ,विविध कला व गुणदर्शन कार्यक्रम ,रक्तदान शिबीर ,आदर्श शिक्षक व शिक्षकेतर पुरस्कार वितरण सोहळा अश्या भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे पेठ वडगाव व पंचक्रोशीतील सर्व शाळांच्या विद्यार्थ्यांनी सर्व स्पर्धांमध्ये सहभाग घ्यावा असे आवाहनही करण्यात आले आहे .
या पत्रकार परिषदेस डॉ.सायरस पूनावाला स्कूलचे संचालक डॉ.सरदार जाधव, प्राचार्य शिवाजीराव पाटील,प्राचार्य अधिकराव निकम, मुख्याध्यापिका शोभा देसावळे, श्रुती महाजन, उपप्राचार्य के.के.कोळी, डॉ.सचिन पवार, अभिजीत गायकवाड आदी प्रमुख उपस्थित होते.

No comments :

Post a Comment