Powered by Blogger.

Wednesday, 12 July 2017

ग्रामसेवकाची बदली न केल्यास टाळे ठोकण्याचा शिवसेनेचा इशारा

No comments :

हेरले/ प्रतिनिधी दि. १२/७/१७
     हातकणंगले तालूक्यातील मौजे वडगाव ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक ए.पी. द्रविड यांची तात्काळ सात दिवसात बदली करावी अन्यथा ग्रामपंचायतीस टाळे ठोकून आंदोलन करण्याचा इशारा  हातकणंगले गटविकास अधिकारी शरदचंद्र माळी यांना लेखी निवेदनाद्वारे शिवसेनेचे शाखाप्रमुख माजी उपसरपंच सुरेश कांबरे यांनी दिला आहे.
        निवेदनातील आशय असा की, मौजे वडगाव येथील ग्रामसेवक ए.पी. द्रविड यांच्या बदली संदर्भात गेली सात ते आठ महिने वेळोवेळी लेखी व तोंडी तक्रारी देऊन सुध्दा हातकणंगले गटविकास अधिकारी शरदचंद्र माळी यांनी सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, लोकप्रतिनिधी यांना चालढकल करीत उडवाउडवीची उत्तरे देऊन आपल्या अधिकाऱ्यास पाठीशी घातले आहे. सात आठ महिन्यापूर्वी मुख्य कार्यकारी अधिकारी यांना तक्रार अर्ज देऊन द्रविड दोषी असल्याचे आढळून आले असून त्यांच्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई अथवा बदली केली नाही.
          म्हणून मौजे वडगाव येथील ग्रामसेवक ए.पी. द्रविड यांची आठ दिवसात बदली न झालेस शिवसेना शाखा, सरपंच, ग्रा.पं. सदस्य, ग्रामस्थ यांच्या वतीने सोमवार दि. १७ रोजी ग्रामपंचायत कार्यालयात ग्रामसेवकांना हजर न करून घेता ग्रामपंचायतीस टाळेठोक आंदोलन करणार आहेत.असा इशारा शिवसेना व संयुक्त समिती यांनी लेखी निवेदनाद्वारे दिला आहे. या निवेदनावरती सरपंच सतिश चौगुले, चेअरमन अॅड . विजयकुमार चौगुले, स्वप्नील चौगुले, सुनिल खारेपाटणे, धर्मेंद्र चौगुले , रघुनाथ गोरड, संतोष सावंत, दिपक लोहार, अमोल झांबरे, प्रकाश कांबरे आदींच्या सह्या आहेत.

No comments :

Post a Comment