Powered by Blogger.

Tuesday, 11 July 2017

इम्तियाज मोमीन यांना आउटस्टॅण्डींग अचिव्हमेंट पुरस्कार जाहीर

No comments :

कोल्हापूर प्रतिनिधी

अॉल इंडिया अॅटोमोबाईल वर्कशॉप असोसिएशनचे बेंगलोर येथे 16 व 17 ला अधिवेशन होणार आहे, या संघटनेने कोल्हापूरचे सुपुत्र इम्तियाज मोमीन यांच्या अॅटोमोबाईल क्षेत्रातील निरनिराळ्या प्रयोगांची दखल घेऊन त्यांना राष्ट्रीय आउटस्टॅण्डींग अचिव्हमेंट पुरस्कार जाहीर केला आहे.
        या कार्यक्रमाला उपस्थित प्रमुख पाहुणे रतन कुमार प्रेसिडेन्ट अॅटो काम्पोनंट मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशन यांच्या हस्ते हा पुरस्कार इम्तियाज मोमीन यांना दिला जाणार आहे
        यापूर्वी इम्तियाज मोमीन यांना उत्कृष्ट मेकँनिक हा  पुरस्कार ग्रुप  ऑफ मीडियाच्या वतीने देण्यात आला होता तसेच त्यांच्या पाण्यात चालणाऱ्या कारची दखल बी बी सी सहित सर्व प्रसार माध्यमांनी घेतली होती

No comments :

Post a Comment