Tuesday, 4 July 2017
कॉ. प्रकाश कांबरे यांच्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना ९०० वह्या , पेन, पुस्तक व शैक्षणिक साहित्य वाटप
हेरले / प्रतिनिधी : दि. ४/७/१७
मौजे वडगांव ( ता. हातकणंगले) येथील सामाजिक कार्यकर्ते कॉ. प्रकाश कांबरे यांच्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त विद्या मंदिर प्राथमिक शाळेत विद्यार्थी- विद्यार्थिनीना ९०० वह्या , पेन, पुस्तक, आदी शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले.
या प्रसंगी प्रमुख पाहूणे बँक एम्प्लॉईज युनियनचे अध्यक्ष कॉं. अतुल दिघे, माजी जि .प. सदस्य तथा हातकणंगले तालुका संजय गांधी निराधार योजना अध्यक्ष महेश चव्हाण उपस्थित होते.माजी उपसरपंच सुरेश कांबरे, ग्रा.पं. सदस्या संगीता कांबरे,श्रमिक पतसंस्था सेक्रेटरी रजनी पाटील, पोलीस पाटील अमीर हजारी, शालेय शिक्षण समीती अध्यक्ष संतोष मोरे, निवास शेंडगे, सुवर्णकार सचिन लोहार, पवन जाधव, शुभम जाधव, संजय ढेरे, अमोल झांबरे, महादेव चौगुले, सतीश कांबरे, सुनिल खारेपाटणे आदी मान्यवरांच्या हस्ते शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.
प्रास्तविक प्रशांत पाटील यांनी केले तर आभार शाळेचे मुख्याध्यापक ए .के. पाटील यांनी मानले.
याप्रसंगी शिवाजी पाटील, शिवाजी लोखंडे, प्रशांत पाटील, माणिक पाडळकर, अविष्कार कांबळे, योगेश पाखले, कटकोळे, श्रद्धा गोखले, नदाफ आदी शिक्षक वृंद, शालेय समिती सदस्य, शालेय पोषण ठेकेदार सुनिल गरड , महिला, पालक, माता, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
फोटो
मौजे वडगांव प्राथमिक शाळेत मान्यवरांच्या हस्ते शैक्षणिक साहित्य वाटप करतांना मान्यवर.
No comments :
Post a Comment