Powered by Blogger.

Tuesday, 4 July 2017

हजारो भाविकांनी पुईखडीत अनुभवला वाखरी मय रिंगण सोहळा

No comments :

    कोल्हापूर -

प्रति पंढरपूर नंदवाळ च्या वाटेवर वाशी - पुई खडी येथील संकल्प सिध्दी समोरील मैदानावर हजारो भाविकानी वाखरी प्रमाणे अनुभवला माऊली रिंगण सोहळा विठू नामाच्या गजरात अनुभवला . महापौर हसिना फरास , पोलिस अधिकारी आर .आर. पाटील , उपमहापौर अर्जुन माने , सारंगधर देशमुख यांनी माऊली - संग्राम या अश्वाचे  व पालखी चे पूजन केले . त्या नंतर टाळ करी , विणाधारी, पताका वाले वारकरी सह तुळशी धारक महिलानी रिंगण  केल्यावर माऊली अश्वाने सात फेऱ्या भक्तीमय वातावरणात पुर्ण केल्या . त्या नतंर माती असंख्य भाविकानी कपाळी लावली. या पुर्वी भाविकानी संकल्प सिध्दी मंगल कार्यालयात पालखी दर्शन व विसावा घेणेसाठी थांबली तिथे  भाविकाना राधेय समूह व प्रताप पाटील परिवारातफै फराळ व चहा वाटप करण्यात आले . रिंगण सोहळा संपन्न झाले वर केलेल्या आहवानास प्रतिसाद देत चांदी पालखी शिल्लक कामासाठी कुरडू चे संरपंच संदीप पाटील आणि राहूल पाटील मित्र परिवार यांनी प्रत्येकी . एक किलो आणि पिरवाडी चे पांडुरंग मिठारी यांनी अर्धा किलो चांदी देणेचे जाहीर केले . या नंतर पालखी सह दिंडी प्रमुख हभप आनंदराव लाड महाराज, चोपदार भगवान तिवले सह नंदवाळकडे रवाना झाली .आज सकाळी साडेसात वाजता मिरजकर तिकटी विठ्ठल मंदिरात अभय देशपांडे , राजवाडा पोलिस स्थानकाचे भुजबळ, विठ्ठल दराडे , दीपक गौड , यशवंत भालकर बाळासो पवार , सुरेश जरग, राजेन्द्र मकोटे , पुजारी जोशी यांनी सामुहिक आरती केल्यावर दिंडी मार्गस्थ झाली. दीडी मार्गावर सुदर्शन मित्र मंडळ , निवृत्ती चौक रिक्षा मंडळ , आनंदराव ठोंबरे - वस्ताद , श्रीराम एजन्सी , राधेय समूह , साहेबराव काशिद ,भगिरथी महिला मंडळ यांनी केळी  - दूध - फराळ वाटप केले . दिंडी मार्गावर कळंबा ग्रामपंचायत व तंदूर समुहाने स्वच्छता मोहिम राबवली . त्यांना  संयोजक ज्ञानेश्वर माऊली पालखी सोहळा भक्त मंडळा वतीने राजेंन्द्र किंकर , संतोष कुलकणी पुजारी राजेंद्र पाटील , वासुदेव संभाजी पाटील कांडगांवकर यांचे हस्ते श्रीफळ देण्यात आले . या प्रति पंढरपूर नंदवाळ दीडी मध्ये हुपरी , हळदी , काडगांव, कागल , इचलकरंजी सह ३४ खेडेगावातील वारकरी सहभागी झाले होते .

No comments :

Post a Comment