Friday, 11 August 2017
चांगल्या स्वप्नांचे ध्येय गाठण्यासाठी योग्य रस्त्याची निवड करावी - प्रा. डॉ. प्रविण चव्हाण
हेरले/ प्रतिनिधी दि. ११/८/१७
विद्यार्थ्यांनी प्रथम स्वप्ने पहावीत त्यानंतर आयुष्यात काय करायचे ते ठरवावे. चांगल्या स्वप्नांचे ध्येय गाठण्यासाठी योग्य रस्त्याची निवड करावी असे मत सायबर महाविद्यालयाचे प्रा. डॉ. प्रविण चव्हाण यांनी व्यक्त केले. रोटरी क्लब आॅफ गार्गिजच्या वतीने कोरगावकर हायस्कूल मधील दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित करीअर मार्गदर्शन कार्यक्रमात ते बोलत होते. विशाखा आपटे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होत्या.
डॉ. चव्हाण यांनी माजी राष्ट्रपती ए. पी. जी. अब्दुल कलाम, बील गेट्स, अमिताभ बच्चन या सारखे अनेक व्यक्तीनी स्वप्नांचा पाठपुरावा केला आणि ते यशस्वी झाले. त्याप्रमाने विद्यार्थ्यांनाही शिक्षणात अनेक मार्ग पहावयास मिळतात. पण सर्वच मार्गांचा हव्यास न ठेवता जो मार्ग आपल्या करिअरसाठी व उद्दीष्ठसाठी योग्य आहे. तोच मार्ग निवडून आपले करिअर घडवावे असे आवाहन श्री. चव्हाण यांनी केले.
याप्रसंगी क्लबच्या सचिव सौ. गौरी शिरगावकर, मुख्याध्यापक श्री. संकपाळ, सौ.पल्लवी कोरगावकर, शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.
.....................
फोटो
कोल्हापूर : येथील कोरगावकर हायस्कुल मधिल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना डाॅ. प्रविण चव्हाण, शेजारी सौ. विशाखा आपटे, सौ. गौरी शिरगावकर आदी.
..................................................................
No comments :
Post a Comment