Thursday, 10 August 2017
प्रभाकर काशिद यांची कोल्हापूर जिल्हा युवक राष्ट्रवादी काँग्रेस उपाध्यक्षपदी नियुक्ती
कोल्हापूर शिये गावचे युवा नेते श्री. प्रभाकर पांडुरंग काशिद यांची कोल्हापूर जिल्हा युवक राष्ट्रवादी काँग्रेस उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. कोल्हापूर जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रोहित पाटील यांनी त्यांना नियुक्ती चे पत्र दिले आहे. माजी मंत्री आ. हसन मुश्रीफ, निवेदिता माने, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस करवीर तालुका अध्यक्ष मधुकर जांभळे यांच्या विशेष सहकार्याने हि नियुक्ती करण्यात आली आहे
कोल्हापूर जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष झाल्याबद्दल त्यांचे सर्वत्र हार्दिक अभिनंदन करण्यात येत आहे.
Subscribe to:
Post Comments
(
Atom
)
No comments :
Post a Comment