Powered by Blogger.

Monday, 14 August 2017

गुडघेदुखी सोपे उपचार

No comments :

वाढत्या वयात किंवा वजन वाढलं आणि
धावल्याने, चालण्याने किंवा सतत एका जागेवर उभे राहिल्याने पायाला थकवा जाणवू लागतो. या परिस्थितीत गुडघेदुखीचा त्रास उद्भवू शकतो आणि त्यावर घरगुती उपायांनी सुद्धा आराम मिळू शकतो. त्यासाठी वाचा पुढील काही सोप्पे उपाय .

एक ग्लास गरम पाणी पिण्याने ७० टक्के दुखण्यापासून आराम मिळतो. तसेच नारळ गुडघेदुखीसाठी एक चांगली औषधी आहे. रोज नारळ खावे. नारळाचे दूध प्यावे. गुडघ्यावर दोनदा नारळाच्या तेलाने मालीश करावी.

एक कप पाण्यात ८ खजूर रात्रभर भिजवून ठेवा. सकाळी रिकाम्या पोटी हे खा. ज्या पाण्यात भिजवले असतील ते प्या.

एक लहान चमचा सूंठ पावडरमध्ये मोहरीचे तेल मिसळा. याची पेस्ट तयार करून दिवसातून दोनदा लावा. काही तासाने धुऊन टाका.

५ बदाम, ५ काळी मिरी, १० मनुका आणि ६ अक्रोड गरम दुधासोबत सेवन करावे. हा प्रयोग केल्याने आराम मिळेल.

एक लहान चमचा हळद पावडर, एक लहान चमचा साखर बुरा, किंवा मध, आणि एक चुटकी चुना हे सर्व पदार्थ आवश्यकतेनुसार पाणी मिसळून पेस्ट तयार करावी. ही पेस्ट झोपण्यापूर्वी गुडघ्यावर लावावी. सकाळी धुऊन टाकावी. आराम मिळेल.

No comments :

Post a Comment