Powered by Blogger.

Monday, 14 August 2017

मौजे वडगांव येथे विद्यार्थ्यांना उद्योगपती अविनाश पाटील यांच्याकडून मोफत गणवेशांचे वाटप

No comments :

हेरले प्रतिनिधी : दि.१४/८/१७
       मौजे वडगांव ( ता. हातकणंगले ) येथील विद्यामंदिर मधील गरीब व गरजू विदयार्थ्यांना उद्योगपती अविनाश पाटील यांनी मोफत शालेय गणवेशांचे वाटप केले.
       गावातील युवा वर्ग मोठ्या प्रमाणात शाळेला मदत करत असुन यापूर्वी संजय सावंत, प्रदिप लोहार यानी संगणक, प्रोजेक्टर व भूपाल कांबळे सामाजीक कार्यकर्ते प्रकाश कांबरे यांनी १००० वह्या, पेन, पोलीस पाटील अमीर हजारी यांनी कंपास,पॅड  फोटोग्राफर विश्वास शेंडगे यांनी २०० पेन, शालेय शिक्षण समिती अध्यक्ष संतोष मोरे हे देखील लागेल ती मदत भरभरून करतात.
  यावेळी उद्योगपती,अविनाश पाटील, सरपंच सतीश चौगुले, सामाजिक कार्यकर्ते, प्रकाश कांबरे, पोलीस पाटील अमीर हजारी, माजी उपसरपंच सुरेश कांबरे ,स्वप्नील चौगुले,अमोल झांबरे, सुनिल खारेपाटणे, भाजपा शाखाप्रमुख प्रदिप लोहार, तालुका चिटणीस आनंदा थोरवत, अनु . जाती उपाध्यक्ष भूपाल कांबळे, कपील कांबळे  उपस्थित होते.
प्रास्तवीक मुख्याध्यापक ए .के. पाटील, यांनी तर आभार  योगेश पाखले  यांनी मानले. शिवाजी पाटील, शिवाजी लोखंडे, प्रशांत पाटील, माणिक पाडळकर, अविष्कार कांबळे, अध्यापिका गोखले , नदाफ, कोठावळे,  सह सर्व शिक्षक वृंद, उपस्थित होते.

        फोटो - मौजे वडगांव मधील विदया मंदिर उदयोगपती अविनाश पाटील मुलांना गणवेश वाटप करतांना सोबत अन्य मान्यवर.

No comments :

Post a Comment