Powered by Blogger.

Thursday, 17 August 2017

कोल्हापूर जिल्ह्यातील शिक्षक समस्येबाबत शिक्षक दरबार

No comments :


प्रतिनिधी सतिश लोहार
कोल्हापुर जिल्ह्यातील मुख्याध्यापक,शिक्षक,व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या प्रलंबित प्रश्नासाठी आमदार दत्तात्रय सावंत यानी शिक्षणाधिकारी भंडारे व पे यूनिट अधीक्षक मोरे यांच्या समवेत देशभूषण हायस्कूल कोल्हापुर येथे शिक्षक दरबार घेण्यात आला या मध्ये 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी नियुक्त केलेल्या भविष्य निर्वाह निधिची खाते उघडून देनेसाठी चर्चा करण्यात आली कोर्ट निर्णयानुसार कार्यवाही करू  असे पे यूनिट अधीक्षक यांनी जाहिर केले, ज्याना निधिची खाते आहेत त्यांची निधिच्या पावत्यांचा हिशोब येत्या महीना अखेर तालुका निहाय कैम्प लावून देण्यात येईल याची ग्वाही शिक्षणाधिकारी भंडारी यानी यामध्ये दिली,तसेच शासन निर्णयानुसार 2012 नंतर नियुक्त केलेल्या गणित,इंग्रजी,विज्ञान विषयाच्या शिक्षकांची नावे शालार्थ प्रणाली शालार्थ प्रणालिमध्ये समाविष्ट करणेसाठीच प्रस्ताव तात्काळ वरिष्ठ कार्यालयास पाठवतो याची ग्वाही भंडारी यानी दिली,सेवक संचमधील त्रुटि प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयास पाठविण्यात येईल असे शिक्षणाधिकारी कार्यालयाकडून सांगण्यात आले या वेळी महाराष्ट्र शाळा कृती समितीचे कार्याध्यक्ष बाबासाहेब पाटील सर,दत्ता पाटील सर,समाधान घाडगे सर,मारुती गायकवाड सर,एम आर पाटील सर,सुरेश संकपाळ सर,म्हैसाळे सर,मजीद पटेल सर,अजित रणदिवे सर,पोपट पाटील सर व महाराष्ट्र राज्य शाळा कृती समिती पदाधिकारी , महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना पदाधिकारी व बहुसंख्य संख्येने शिक्षक उपस्थित होते .

No comments :

Post a Comment