Friday, 18 August 2017
सेनापती कापशीत भारतीय जनता युवा मोर्चा शाखेचे उद्घाटन
सेनापती कापशी / वार्ताहर –
सेनापती कापशी ( ता – कागल) येथे भारतीय जनता युवा मोर्चा शाखेची स्थापना करण्यात आली. शाखेचे उद्घाटन म्हाडाचे अध्यक्ष समरजीतसिंह घाटगे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख उपस्थितीत भाजप सरचिटणीस सुदर्शन पाटसकर, शाहू कारखान्याचे व्हा. चेअरमन अमरसिंह घोरपडे, , भारतीय जनता युवा मोर्चा कागल तालुका अध्यक्ष किरण मुळीक, उमेश देसाई, राजाभाऊ माळी हे होते.
दरम्यान, भारतीय जनता युवा मोर्चाची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. कापशी शाखा अध्यक्षपदी शिबीराज शिउडकर, उपाध्यक्षपदी संजय लोकरे, सरचिटणीस प्रकाश चव्हाण, कोषाध्यक्ष विनोद तीप्पे, उपकोशाध्यक्ष निवास कुंभार, खजिनदारपदी संदीप कोले यांची निवड करण्यात आली. यावेळी सुनील सूर्यवंशी, प्रकाश घाटगे, जितेंद्र घाटगे, नितीन शिउडकर आदि शाखेचे सर्व सदस्य व भागातील सर्व कार्यकर्ते उपस्थित होते.
फोटो - सेनापती कापशी ( ता – कागल) येथे भारतीय जनता युवा मोर्चा शाखेचे उद्घाटन प्रसंगी म्हाडाचे अध्यक्ष समरजीतसिंह घाटगे, अमरसिंह घोरपडे, उमेश देसाई आदि मान्यवर
No comments :
Post a Comment