Friday, 4 August 2017
सिंगापूर येथे आशियाई योगा चॅम्पियनशीप स्पर्धेत सुवर्णमय कामगिरी करणार्या कु. ईश्वरी वरदाई व सचिन पोवार यांचे इचलकरंजीत जल्लोषी स्वागत
इचलकरंजी/प्रतिनिधी -
सिंगापूर येथे पार पडलेल्या जागतिक आशियाई योगा चॅम्पियनशीप स्पर्धेत सुवर्णमय कामगिरी करणार्या कु. ईश्वरी प्रकाश वरदाई व सचिन सुर्यकांत पोवार यांचे वस्त्रनगरी इचलकरंजीत जल्लोषी स्वागत करण्यात आले. तसेच या दोघांची शहरातून सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. या स्पर्धेत ईश्वरी हिने 2 सुवर्ण व 1 रजत तर सचिनने 1 सुवर्ण व 2 रजत पदके मिळविली आहेत.
गत आठवड्यात सिंगापूर येथे या योगा चॅम्पियनशीप स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये येथील सोहम योग अॅकॅडमीचे खेळाडू असलेल्या ईश्वरी वरदाई व सचिन पोवार यांनी दैदिप्यमान कामगिरी करत वस्त्रनगरीच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. त्यांच्या या यशाने महाराष्ट्रासह कोल्हापूर जिल्हा आणि इचलकरंजीचे नांव सातासमुद्रापार झळकले आहे.
ईश्वरी वरदाई, सचिन पोवार व योग प्रशिक्षक सुहास पोवळे यांचे गुरुवारी इचलकरंजीत आगमन झाले. या सर्वांचे येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा चौकात जल्लोषात स्वागत करण्यात आले. माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे, नगराध्यक्षा सौ. अलका स्वामी यांच्या हस्ते खेळाडूंचे सत्कार करण्यात आला. यावेळी उपनगराध्यक्ष प्रकाश मोरबाळे, शहर वाहतूक नियंत्रण शाखेचे अरुण पोवार, मुख्याध्यापिका सुप्रिया गोंदकर, प्रा. शेखर शहा, शंकर पोवार आदींची उपस्थिती होती.
त्यानंतर सवाद्य जल्लोषी मिरवणूकीला सुरुवात झाली. मिरवणूक मार्गात उद्योगपती मदनलाल बोहरा, हरिष बोहरा, मनोहर वडींगे, सुनिल सुतके, पै. अमृत भोसले, हेमंत भांडवले, बाळासाहेब पोकार्डे आदींनी खेळाडूंचा सत्कार केला. मुख्य मार्गावरुन कॉ. मलाबादे चौक, गांधी पुतळामार्गे बाळकृष्ण बुवा मंदिर येथे आल्यानंतर मिरवणूकीची सांगता झाली. या मिरवणूकीत श्यामसुंदर मर्दा, पांडुरंग मेटे, रविकुमार शर्मा, सुरेश जाजू, तात्यासाहेब कुंभोजे, प्रकाश वरदाई, सौ. प्रिया वरदाई, सुर्यकांत पोवार, सौ. रेखा पोवार, महेश शेळके, राहुल धोंडपुडे, निलेश कागिनकर, विजय हावळ, सौ. पुनम खोत, अमित कागले, राहुल कुलकर्णी, गणेश बरगाले, अभि बचाटे, रवि चौगुले, संजीव कांबळे, डी. वाय. कांबळे, अशोक नेजे, उर्मिला पाटील, विश्वनाथ माळी आदींसह व्यंकटराव हायस्कूल, गोविंदराव हायस्कूल, डीकेटीई, इचलकरंजी हायस्कुल नारायणमळा, शाहू हायस्कूलमधील विद्यार्थी-विद्यार्थीनी, डायनॅमिक स्पोर्टस्, जयहिंद मंडळासह विविध मंडळांचे पदाधिकारी, खेळाडू सहभागी झाल होते.
No comments :
Post a Comment