Powered by Blogger.

Saturday 16 September 2017

एनसीसी कोल्हापूरचे दहा दिवसीय वार्षिक प्रशिक्षण शिबीर उत्साहात संपन्न

No comments :

हेर्ले / वार्ताहर दि. १६/९/१७

पाच महाराष्ट्र बटालियन एनसीसी कोल्हापूरच्या वतीने घेण्यात आलेले दहा दिवसीय वार्षिक प्रशिक्षण शिबीर उत्साहात संपन्न झाले.या शिबीराचे नेतृत्व कमांडिंग ऑफिसर कर्नल आर.के.तिम्मापूर यांनी केले. ग्रुप कंमांडर ब्रिगेडिअर पी.एस. राणा यांच्या हस्ते विविध स्पर्धेतील यशस्वी छात्रसैनिकांना बक्षिसे वितरीत करण्यात आली.
     या वार्षिक प्रशिक्षण शिबीरात कोल्हापूर, सिंधूदुर्ग, रत्नागिरी या तिन जिल्ह्यातील ४०१ छात्रसैनिक सहभागी झाले होते. यांच्यामध्ये इंटर कंपीनी घेतलेल्या स्पर्धेचा निकाल - लाईन एरिया प्रथम ब्राओ कंपनी, क्रॉसकंट्री प्रथम डेल्टा कंपनी, फायरिंग चार्ली कंपनी, ड्रील डेल्टा कंपनी, ओव्हर ऑल चॅम्पीयनशीप निकाल हेल्टा प्रथम,चार्ली द्वितीय, अॅल्फा तृतीय, ब्राओ चतुर्थ.
       क्रॉस कंट्री स्पर्धेमध्ये एस. डी. कॅडेट प्रथम प्रदीप डी.आर. माने कॉलेज कागल, ' द्वितीय युवराज मगदूम भोगावती कॉलेज कुरूकली, जे.डी. कॅडेट प्रथम सिध्दांत सुरेश पुजारी, द्वितीय सत्यजीत सुरेश पुजारी डि. निकम हायस्कूल कागल.फायरिंग चॅम्पीयन एस.डी. कॅडेट कपिल पसाले डॉ.आंबेडकर कॉलेज पेठवडगांव, द्वितीय अक्षय साताप्पा पाटील गोगटे कॉलेज रत्नागिरी.जे.डी. कडेट प्रथम अशिष प्रसन्न शेवडे पटवर्धन हाय. रत्नागिरी, द्वितीय शुभम संदिप परब कुडाळ हाय.कुडाळ.
    ओव्हर ऑल बेस्ट कॅडेट एस.डी.सागर सरवणकर कणकवली कौलेज कणकवली, प्रदीप चौगुले डी.आर. माने कॉलेज कागल, जे.डी. कॅडेट वेदप्रकाश वायचळ केपीएस हाय.कोल्हापूर, सिध्दांत पुजारी डी. निकम व्हन्नूर, ओव्हरऑल कंमाड कंट्रोल बीयुओ विशाल पाडळकर छत्रपती शहाजी कॉलेज कोल्हापूर मानकरी ठरला.
        मेजर विश्वनाथ कांबळीमठ,एनसीसी अधिकारी सुधाकर निर्मळे, डॉ.आर.एस. नाईक, राजेश पालकर, विकास कुंभार, डॉ.बी.एल. राठोड, सुभेदार मेजर श्रावण यादव, एस.एच.पोतदार,सुभेदार मोहन सुर्यवंशी, विजय वांगेकर, हरी गावडे, राजाराम पाटील, अशोक, बांभूगडे, नायब सुभेदार अरविंद सिंग, बी.एच.एम.बाजीराव माने, सी.एच.एम. संजय मांगले, राजकिशोर, हवालदार भरत पाटील, गणेश मोरे, मारूती पाटील, कृष्णात यादव, सुनिल बोडके, राजाराम मगदूम, निलेश, संतोष कुमार आदी अधिकारी वर्गाचे मार्गदर्शन लाभले.
      फोटो कॅप्शन
चॅम्पीयन डेल्टा कंपनीस चषक प्रदान करतांना ग्रुप कंमांडर ब्रिगेडिअर पी.एस. राणा सीओ कर्नल आर.के.तिम्मापूर सोबत अन्य मान्यवर
( छाया- सुधाकर निर्मळे)

No comments :

Post a Comment