Powered by Blogger.

Monday, 27 February 2017

समरजितसिंह घाटगेंची जळीतग्रस्त कोळेकर कुटूंबाला 50000 रु ची मदत जाहीर : भेटून केले सांत्वन.

No comments :

मुरगुड प्रतिनिधी

समीर कटके :

येथील बाजार पेठेत गुरुवारी मध्यरात्री कोळेकर कापड दुकान व राहत्या घरास आग लागल्याने त्या

कुटुंबासह अन्य दोन कुटूंबे उघड्यावर पडली आहेत.आई - वडीलांचा आधारच गेल्याने रोहीत व

ज्ञानेश्वरी ही दोन्ही मुले अनाथ झाली आहेत.आजोबा वार्धक्याने अंथरुणास खिळून आहेत. कुटुंबाच्या

मागे तातडीची मदत उभी करणे गरजेची आहे. त्यांना सर्वतोपरी साहाय्य करु असे आश्वासन देवून

तातडीची मदत म्हणून शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांनी 50000 रु ची मदत जाहीर

केली.

आज समरजितसिंह घाटगे व त्यांच्या पत्नी नवोदिता घाटगे यांनी मुरगूड येथील अग्निकांडात बळी

पडलेले कोळेकर कापड दुकानाचे मालक धनंजय व त्यांच्या पत्नी प्रियांका यांच्या कुटुंबियांना भेट देऊन

सांत्वन केले. धनंजय व प्रियांका कोळेकर यांची मुले रोहीत व ज्ञानेश्वरी व त्यांचे आई वडील यांना

धीर दिला व कठीण प्रसंगी पाठीशी आहोत अशा भावना व्यक्त केल्या

या दुर्घटनेमध्ये कोळेकर यांच्या दुकानासह महादेव मडीलगेकर यांचे सायकल स्पेअरपार्ट्सचे दुकान व

कृष्णात रानमाळे यांचे टेलरिंग मशीन स्पेअरपार्ट्स विक्रीचे दुकान अग्नीच्या भक्ष्यस्थानी पडले. त्यांचे

अनुक्रमे 3 लाख व 2 लाखाचे नुकसान झाले आहे.याबद्दलही श्री.घाटगेंनी दु: ख व्यक्त केले.

यावेळी त्यांनी मुरगुडच्या नागरिकांनी सुरु केलेल्या मदत कार्याची माहिती घेतली.यावेळी

दत्तामामा खराडे,सुनिलराज सुर्यवंशी,सुनिल कांबळे,विष्णू मोरबाळे, रामचंद्र खराडे, अनंत फर्नांडिस,विनय

पोतदार, जयवंत पाटील, किरण मडीलगेकर, विशाल सूर्यवंशी, राहुल खराडे, विकी साळोखे, सुहास मोरे,

मनोहर आवटे, निवृत्ती वंडकर, आदी उपस्थित होते.

No comments :

Post a Comment