Sunday, 12 February 2017
नकारात्मक राजकारण टाळून विकासावर बोला - समरजितसिंह घाटगे यांचे विरोधकांना आव्हान
प्रतिनिधी - समीर कटके
संजय गांधी निराधार योजनेतील गरीब निराधार महिलांना मतांसाठी वेठीस धरले जात आहे प्रचार
सभांना उपस्थित राहण्यास भाग पाडले जाते. महिलांच्या लाचारीवर धंदा करणाऱ्याना लाज वाटली
पाहिजे. पाच टक्के तरी विकास कामावर बोला. रडगाणं बंद करा. जि प पंचायत समितीची सत्ता 35
वर्ष भोगणार्यांनी मागासवर्गीय समाजाला धाब्यावर पोहोचवले, असा आरोप समरजितसिंह घाटगे यांनी केला.शिंदेवाडी ता कागल यथे आयोजित प्रचार सभेत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी विश्वनाथ शिंदे गुरुजी होते. गोकुळचे .संचालक रणजितसिंह पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती .
घाटगे पुढे म्हणाले पंचायत समितीत सत्तेत बसणाऱ्यानी मागास समाजाचा निधी पळवून इतर
समाजाचा विकास केला ज्यामुळे दोन समाजामध्ये तेढ वाढवण्यासाठी व आपली मतांची पोळी
भाजण्यासाठी हे जाणीवपूर्वक केले. धनगर समाजाने मेंढ्याच पाळाव्यात मुसलमान समाजाने केळीच
विकावी मागास समाजाने कच्च्या घरातच राहावं त्यांनी नेहमी लाचारच रहावे अशी अवस्था करून
केवळ मतांचा धंदाच केला असा आरोप केला त्यांनी केला. गेल्या 35 वर्षात पंचायत समितीच्या
सत्ताधार्यांनी अवजारे, विहीर खुदाई इतर अनुदानातील 50 टक्के मलाई खाल्ली. महिलांना लघु
उद्योगासाठी झेरॉक्स, शिलाइ मशीन पीठ गिरणी मुलींना सायकल पुरवण्याची योजना किती महिलांपर्यंतपोहचली असा सवाल त्यांनी विचारला. नवोदिता घाटगे यांच्या पुढाकाराने महिलांसाठी जिजाऊ संघटना उभारून जिपच्या सर्व योजना महिलांपर्यंत पोहचवणार असे आश्वासन त्यांनी दिले. रडगाणं बंद करा व विकासावर दोन मिनीटे तरी बोला. खालच्या पातळीवर टीका बंद करा. तुम्हाला विकासाचे बोलता येत नाही , तुमच्या कडे विकासाची दृष्टी नाही, तुमच्याकडे विकासाची धमक व कुवतही नाही असा घणाघती आरोप त्यांनी केले. आता विकासाला मते पडली पाहिजेत.नकारात्मक राजकारणापासून फारकत घेऊन आता स्वराज्य निर्माण करूया असे आवाहन त्यांनी केले.
गोकुळ संचालक रणजितसिंह पाटील म्हणाले आज सध्याच्या परिस्थितीची जाण असणाऱ्या
तरुणांची भाजप प्रवेशाची लाट सुरु झाली आहे . 1978ची परिस्थिती निर्माण झाली असून 2019 साली त्याची पुनरावृत्ती होईल. या निवडणुकीत कोणाला थांबवायचं याचा निर्णय लोकांनी घेतला आहे. काही माणसे बेताल बोलत आहेत, राज्य आणि देशपातळीवर आदर्श ठरलेल्या शाहू साखर कारखान्यामध्ये संधी द्या म्हणत आहेत . जनता खुळी नाही .तुम्ही काय साधायचा प्रयत्न करीत आहात हे जनता जाणून आहे. तालुका भाजपमय होत असल्याने काही लोकांच्या पोटात कालवाकालव होत आहे.पक्षाने दिलेला उमेदवार आपला मानून त्याला विजयी करावे असे आवाहन त्यांनी केले .
स्वागत रामचंद्र खराडे यांनी केले प्रास्ताविक सरपंच दत्तामामा खराडे यांनी केले. अमोल शिवई
सुळकुड यांनी मनोगत व्यक्त केले.
यावेळी विश्वजित पाटील, ईश्वरा शिंदे, वसंतराव पाटील, संजय पाटील, विष्णू राऊत, दगडू शेणवी, विलासराव गुरव, मनोहर आवटे, सुहास मोरे, अनंत फर्नांडिस, समरजीत खराडे, अरविंद खराडे, मानसिंग खराडे, विजय कदम, रॉबर्ट फर्नांडिस, सुरज एकल,आदी मान्यवर उपस्थित होते
Subscribe to:
Post Comments
(
Atom
)

No comments :
Post a Comment