Powered by Blogger.

Saturday, 11 February 2017

सर्वाधिक जागा जिंकून शिवसेना जिल्ह्यात प्रथम क्रमांकाचा पक्ष बनेल - प्रा संजय मंडलिक यांचे प्रतिपादन

No comments :
प्रतिनिधी - समीर कटके

सर्वाधिक   जागा जिंकून शिवसेना जिल्ह्यात प्रथम क्रमांकाचा पक्ष बनेल. यात सर्वाधिक जागा जिंकून देणारा कागल हा तालुका असेल त्यामुळे जि प वर सेनेचा भगवा फडकेल यात कोणतीही शंका नाही , असे प्रतिपादन प्रा संजय मंडलिक यांनी केले .
यमगे (ता.कागल ) येथे शिवसेनेच्या आयोजीत कार्यकर्त्यांच्या बैठकीत बोलत होते.के.डी.कोंडेकर
अध्यक्षस्थानी होते.प्रा.मंडलिक म्हणाले,आपण मतदार संघात 26 कोटींची विकासकामे केली आहेत.शासनाच्या विविधयोजना खेचून आणल्या आहेत.आमदार मुश्रीफ हे बुध्दीभेदाचे राजकारण करत आहेत.त्यांच्या वर्तनामूळेच ते एकटे पडले आहेत.तालुक्यात आता गटा - तटाच्या निवडणूका बाजूला पडल्या असून पक्षीय राजकारण सुरु झाले आहे.भाजपचे नेते समरजितसिंह घाटगे आमच्या शून्य जागा निवडून येतील अस म्हणतात.मग नेता अस म्हणत असेल तर भाजप पक्षाला मते देवून कशाला वाया घालवता असे उदगार प्रा.संजय मंडलिक यांनी काढले. भाजपचे नेते समरजितसिंह घाटगे आमच्या शून्य जागा निवडून येतील अस म्हणतात.मग नेता अस म्हणत असेल तर भाजप पक्षाला मते देवून कशाला वाया घालवता असेही ते म्हणाले

 संजय घाटगे म्हणाले,पंचायत समितीत चांगला कारभार केला आहे.गोरगरीबांना विविध योजनांचा लाभ मिळवून दिला आहे.त्यामूळेच आमच्याकडे सर्वाधिक सत्ता दिली.सभापती व उपसभापती पद हे रोटेशन पध्दतीने आमच्या व मंडलिक गटाकडे देण्याचे ठरविले आहे. त्यामूळे विकासाला चालना मिळेल.

स्वागत दिलीप पाटील यांनी,प्रास्ताविक विजय भोसले यांनी केले ,
सभेस चंद्रकांत भोळे,आर.डी.पाटील,उमेदवार शिवानी भोसले,विजय भोसले, एस.आर.बाईत,धनाजी
गोधडे,गुरुदेव सुर्यवंशी,संजय पाटील आदी हजर होते.

No comments :

Post a Comment