Saturday, 11 February 2017
शिवस्वराज्य प्रतिष्ठान,मुरगूड शिवजयंती उत्सव भव्यदिव्य साजरा करणार
प्रतिनिधी - समीर कटके
मुरगुड ता कागल येथील शिवस्वराज्य प्रतिष्ठान यांच्या वतीने शिवजयंती उत्सवानिमित्त विविध
कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. उपक्रमाचे हे सहावे वर्ष असून यावर्षी किल्ले पुरंदर व
विजयदुर्ग किल्ल्यांची भव्य प्रतिकृती उभारण्यास प्रारंभ झाला आहे.दि 17 ते 19 या कालवधीत हे
प्रदर्शन नागरिकांसाठी खुले राहणार आहे. त्या बरोबरच शिवशाहीर सदाशिव निकम यांच्या पोवाडा
गायनाचा कार्यक्रम व रोहित माने यांचे व्याख्यान आयोजित केले आहे. अशी माहिती संयोजकांकडून
प्रसिद्धी पत्रकाद्वारे देण्यात आली आहे.
गडकोट प्रतिकृतीचे उदघाटन दि 17 रोजी स 10 वा होणार आहे. शाहीर सदाशिव निकम
यांचा पोवाडा दि 18 रोजी रात्री 8 वा आयोजित केला आहे . 19 फेब्रुवारी रोजी शिवरायांचा जन्म
सोहळा व रात्री 8 वा व्याख्याते रोहित माने यांचे शिवकालीन महाराष्ट्र व आजचा महाराष्ट्र या विषयाचे
व्याख्यान होणार आहे.
किल्ले पुरंदर प्रतिकृतीमध्ये पुरंदरेश्वर मंदिर, दिल्ली दरवाजा, केदारेश्वर मंदिर, राजाळे तलाव, राजगादी
, माची बालेकिल्ला , वज्रगड व इतर ऐतिहासिक बारकावे साकारण्यात येणार आहेत. त्या बाबत मंडळाचे
सदस्यांनी विविध स्रोतांतून माहिती संकलित केली आहे. या कामासाठी प्रतिष्ठानचे अध्यक्ष दिग्विजय
चव्हाण, दिग्विजय खाटांगळे, अक्षय भोसले, धीरज गोधडे, अमृत भोसले, अतुल आमते, पृथ्वीराज भुते,
आकाश कुंभार, करण कुंभार, विनायक परीट, सत्यजित गोधडे, पवन शहापुरे नितीन सावर्डेकर , रोहित
कोदले,अभिजित तोरस्कर आकाश आमते आदी सदस्य विशेष परिश्रम घेताहेत.
सदर कार्यक्रमांना उपस्थित राहून शिवसृष्टीचा आनंद घ्यावा असे आवाहन संयोजकांनी केले आहे.

Subscribe to:
Post Comments
(
Atom
)
No comments :
Post a Comment