Powered by Blogger.

Friday, 17 February 2017

उत्तराखंड मधील रेस्क्यू ऑपरेशन राहत अविस्मरणीय

No comments :
                                                                   स्कॉड्रन लीडर संदीप पोवार


मुरगुड प्रतिनिधी -समीर कटके

उत्तराखंड मधील ढगफुटीच्या दुर्घटना महाप्रचंड होती. भारतीय सेनादलाने हाती घेतलेले ऑपरेशन राहत

सेनादलाच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंदवावे असे आहे. भारतीय एअर फोर्सने यामध्ये मोलाची

कामगिरी बजावली यामध्ये मला सहभागी होता आले ती माझ्या आयुष्यातील अविस्मरणीय घटना

आहे. अभ्यासात सातत्य, उमेद व जिद्द ठेवणारे ग्रामीण भागातील तरुण उच्चपदस्थ सेनाधिकारी

म्हणून उत्कृष्ट कामगिरी बजावू शकतात. ध्येय गाठताना संकटे अडचणी येतातच त्यांचा बाऊ न

करता कष्ट करा असा मौलिक सल्ला स्कॉड्रन लीडर संदीप पोवार यांनी दिला .

दौलतवाडी ता कागल येथे एका कार्यक्रमाच्या निमित्ताने आले असता पत्रकारांनी विचारलेल्या

प्रश्नांना उत्तर देताना ते बोलत होते. यावेळी त्यांनी उत्तराखंड येथील ढगफुटीच्या आपत्तीत बचाव

कार्यादरम्यान आलेले अनुभव सांगितले. ५० तासाहून अधिक काळ प्रतिकूल हवामानात हेलिकॉप्टर

उड्डाणे करावी लागत होती. लोकांना सुरक्षित ठिकाणी आणणे, रसद पोहचवणे, औषधे, अन्न पाणी

पूरवण्याचे जोखमीचे काम करताना थरारक अनुभव आले. या ऑपरेशन द्वारे दहा हजार लोकांना

सुरक्षित ठिकाणी आणले. इतक्या मोठ्या स्तरावर चाललेले ऑपरेशन इतर देशात केव्हा झाले असेल

असे वाटत नाही. रस्ते, लाईट्स नसताना जगाशी संपर्क तुटलेला असताना हे ऑपरेशन भारतीय एअर

फोर्सने यशस्वी केले या बद्दल अभिमान वाटतो. या ऑपरेशन दरम्यान स्थानिक नागरिकांचेही सहकार्य

मिळाले. प्रतिकूल परिस्थितीत निसर्गाचा प्रकोप झेलत हे ही मोहीम यशस्वी झाली.गिनीच बुक ऑफ

वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद व्हावी अशी ती कामगिरी होती. अशा प्रकारचे रेस्क्यू ऑपरेशन आपल्या देशात

सेनादलाने केले नव्हते हि घटना ऐतिहासिक होती जोडीला नागरी प्रशासनही होतेच पण सर्व धुरा

सेनादलाकडे होती. प्रदीर्घ चाललेल्या या मोहिमेत बॉडी फिटनेस नुसार टप्प्याटप्प्याने फ्लाईटचे काम

करावे लागत होते.अल्पकाळ विश्रांती घेऊन पुन्हा कामासाठी सज्ज राहावे लागत होते.पठारी भागातून

हिमालयाच्या दुर्गम भागात रसद पोहचवणे व लोकांना घेऊन येणे हे आव्हान होते असेही ते म्हणाले.

श्री पोवार फ्लाईंग ऑफिसर पदी सेवेत रुजू झाले त्यानंतर फ्लाईट लेफ्टनंट पदावर पदोन्नती व

सध्या ते स्कॉड्रन लीडर या पदावर कार्यरत आहेत. त्यांचे प्राथमिक शिक्षण सरवडे ता

राधानगरी,माध्यमिक शिक्षण सातारा सैनिक शाळेत झाले विज्ञान विभागात उच्च शिक्षण घेऊन ते

एअर फोर्स मध्ये दाखल झाले.

No comments :

Post a Comment