Thursday, 16 February 2017
आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेत मुरगूडच्या सुवर्णपदक पटकावणाऱ्या खेळाडूंची जल्लोषी मिरवणूक
सुवर्णपदक पटकावणाऱ्या खेळाडूंची मिरवणूकीचे दृश्य
मुरगुड प्रतिनिधी समीर कटके
नेपाळ येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेत येथील विद्यार्थिनी कु पूजा कोळेकर शुभम
महादेव खाटांगळे कु.जान्हवी जगदीश सावर्डेकर कु सानिका विनायक धडाम यांनी सुवर्णपदक पटकावले. सुवर्णपदकास गवसणी घालणाऱ्या या चारही खेळाडूंची आता थायलंड येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय
आँलंपिक निवड चाचणी स्पर्धेसाठी निवड झाली आहे .
गोवा येथे झालेल्या राष्ट्रीय कराटे स्पर्धेत त्यांनी सुवर्णपदकासगवसणी घातली होती .
त्यामुळेच त्यांची नेपाळ येथील आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेसाठी निवड झाली
होती . या स्पर्धेत जपान,भूतान,चीन ,नेपाळ व भारत या देशाच्या खेळाडूनी भाग घेतला होता .या
स्पर्धेत तिने सुवर्णपदक पटकावले .त्यामुळे त्यांची आँलंपिक निवड चाचणीसाठी निवड झाली आहे.
या स्पर्धा थायलंड येथे होणार आहेत. या तिच्या यशाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.
मुरगुड मध्ये त्यांची मिरवणूक काढण्यात आली फटाक्यांची आतषबाजी, झांज ढोल ताश्यांच्या
गजरात यशस्वी खेळाडूंची मुरगुड नाका क्रमांक एक, राजीव घंधी चौक , मुरगुड विद्यालय, तुकाराम
चौक , अंबाबाई मंदिर मार्गावरून जल्लोषात मिरवणूक काढण्यात आली. मुख्य मार्गावर खेळाडूंना
नागरिकांनी शुभेच्छा दिल्या.मुरगुड विद्यालय शिवराज विद्यालय , नव इंग्लिश मिडीयम स्कुल, जि प
प्राथमिक शाळा यांकडून खेळाडूंचा गुणगौरव करण्यात आला. मुरगुड विद्यालयाच्या प्रवेशद्वारावर
प्राचार्य पी व्ही शिंदे यांच्या हस्ते खेळाडूंना गौरवण्यात आले यावेळी उपप्राचार्य प्रा एस पी पाटील, एस
आर पाटील ,पी बी लोकरे, एस बी सूर्यवंशी, एस आर सुदर्शनी, एस जी चांदेकर, एस एस कळत्रे , एस बी नाईकवडी, उपस्थित होते.
Subscribe to:
Post Comments
(
Atom
)
No comments :
Post a Comment