Saturday, 18 February 2017
सच्च्या कार्यकर्त्याला निवडून देऊन घराणेशाहीला मूठमाती द्या - खा .राजू शेट्टींची हेरले येथे घराणेशाहीवर घणाघाती टीका
लक्ष्मण कांबरे
हेरले/प्रतिनिधी दि.१८/२/१७
आलास व पट्टणकोडोली मतदार संघात दोन वेळा अनुकंपाखाली जनतेने संधी दिली.काही लोक सात-बारावर नाव लावत आहेत,हा सातबारा पाच वर्षाने निवडणूकीच्या माध्यमातून रिनीव करावा लागतो.जनता सुप्रिम कोर्ट आहे सातबारा कोणाचा आहे तिच निर्णय घेते.एकविस तारखेला जनताच मतदानाच्या रूपाने अनुकंपाखालील वृत्ती गाडून सातबारा कोरा करेल अशी घणाघाती टिका धैर्यशील माने यांचे नाव न घेता खासदार राजू शेट्टी यांनी केली.
ते हेरले(ता.हातकणंगले)येथे रूकडी जिल्हा परिषद मतदार संघाच्या स्वाभिमानी शेतकरी संघटना शिवसेना पुरस्कृत उमेदवार डॉ.पद्माराणी राजेश पाटील व पंचायत समिती उमेदवार महेरनिगा मुनिर जमादार यांच्या प्रचारार्थ जाहिर सभेत बोलत होते.
खास.राजू शेट्टी पुढे म्हणाले की,कर्तृत्वाचा विश्वास उडाला जातो तेंव्हा धर्माची आठवण येते.कर्तृत्वानास जातीची आठवण येत नाही.साईबाबा,कबिर यांची मानव समता ही जात आहे,त्या पगडीतील आम्ही आहोत.सज्जन असंख्य असून असंघटित आहेत व दुर्जन मुठभर असून संघटित असल्याने सत्ता गाजवितात.त्यामुळे सज्जनानी संघटीत होणे गरजेचे आहे.डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेच्या देणगीमुळे माझ्यासारखा गरीब शेतकरी कुटुंबातील मुलगा देशाच्या सर्वोच्च सभागृहामध्ये पोहचला.
जिल्हा परिषद अध्यक्षपद खुले असल्याने डझनभर नेत्यांची मुले,नातलग,सगेसोयरे यांना घराणेशाही जपणाऱ्या पक्षांनी उमेदवारी दिली आहे.मात्र पंधरा वर्षे शेतकरी संघटनेच्या चळवळीस हातभार लावणारे सच्चे कार्यकर्ते व गुणवत्ता,कर्तृत्व,प्रामाणिपणा,
माजी उपसभापती अशोक मुंडे म्हणाले की,कोल्हापूर जिल्ह्यात फोडाफोडी वृत्तीचे नामदार चंद्रकांतदादा पाटील यांनी एका महिन्यात राजकारणाची व सहकार संस्थांची वाट लावली.शिवसेनेने भाजपास मोठे केले त्यानांच बरबाद यांनी केले.
शाहीर कुंतीनाथ करके म्हणाले की,पैशाने विकास होत नसून जनतेच्या पाठबळावर देशाचा विकास होतो.जनतेच्या पाठबळावरच गावचा सर्वांगिण विकास सभापती राजेश पाटील यांनी केला.
भाजपा हातकणंगले तालुका उपाध्यक्ष बंटी पाटील म्हणाले की,आपल्या योग्यतेचा आसणाऱ्यास भेटी ,गॉगल काचातून पाहत महागडया गाडीतून फिरणारे, उच्चभ्रू व कमिशन वृतीस संधी देऊ नका.
सरपंच बालेचाँद जमादार म्हणाले की,गावात भ्रष्टाचार बोकाळला असून तीन चार वर्षाच्या इंस्पेक्टर,पोलीस नोकरीच्या वृत्तीने गावात सौदा चालवलाय.पैसा देऊन विकास होणार नाही,या वृत्तीस दूर ठेवून गावात एकता करून आमदार,खासदार,जि.प.पं.स.माध्यमा
सभापती राजेश पाटील म्हणाले की,काहीजण आपली काय इच्छा,काय पाहीजे? विचारत आहेत.सूर्य,चंद्र,नदी आणून देता का?अशी मागणी करा.दहा वर्ष कुंभकर्णाची झोप काढणारे आता गलोगल्ली फिरत आहेत.ते दहा दिवसाचेच पाहुणे आहेत.सभापती पदाच्या माध्यमातून हेरले परिसरात कोट्यावधींची कामे केली आहेत.हे मी नाही बोलत माझे काम बोलते.
यावेळी उमेदवार डॉ.पद्माराणी पाटील,उपसरपंच संदिप चौगुले,उपसरपंच प्रविण पाटील,सुरेश कदम,सुरेश चौगुले,सुनिल पाटील विजय भोसले,राहूल शेटे यांनी मनोगते व्यक्त केली.याप्रसंगी जिल्हाअध्यक्ष भगवान काटे,व्हा.चेअरमन बाबासाहेब चौगुले,पिंटू मुरूमकर,माजी सरपंच रियाज जमादार,संदिप शेटे,लक्ष्मण निबांळकर,विलास नाईक,छगन शेटे,सुनिल खोचगे,यशपाल पाटील,प्रा.राजगोंड पाटील,मुनिर जमादार,उदय चौगुले,बापूसो पाटील,कपिल भोसले,आदी मान्यवरांसह ग्रा.पं.सदस्य,संस्था पदाधिकारी,ग्रामस्थ मोठया संख्येंनी उपस्थित होते.
Subscribe to:
Post Comments
(
Atom
)
No comments :
Post a Comment