Sunday, 19 February 2017
मुरगूड मध्ये शिवमुर्ती भेट सोहळा संपन्न
समीर कटके
मुरगूड मध्ये शिवजयंतीच्या पुर्वसंधेला शिवमुर्ती भेट सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
सदरच्या या संभाजी ब्रिगेडच्या शिवमुर्ती भेट कार्यक्रमात ५० बाल मंडळांना २फुटी मुर्ती भेट देण्यात
आल्या. संभाजी ब्रिगेडचे शहराध्यक्ष संजय घोडक यांनी उपस्थितांचे स्वागत केले. तर जयवंत हावळ
प्रास्तावीक केले.मा.एम.डी.रावण यांनी या प्रसंगी मनोगत व्यक्त करताना शिवभक्तांसाठी शिवजयंती
संबधीची आचारसंहीता विषद केली. शिवव्याख्याते सागर कोळी यांच्या व्याख्याणाने शिवजयंती
साजरी करणाऱ्या बाल मंडळांना चांगले मार्गदर्शन लाभले. उद्योजक जोतीराम सुर्यवंशी यांच्या शुभ
हस्ते मुर्ती वाटपास शुभारंभ झाला. सदर कार्यक्रमाचे आभार विजय स.गोधडे यांनी मानले
मा.संतोष भोसले राजर्षि शाहु मंडळाचे संस्थापक मा.अमर सणगर , विजय सापळे, अमर देवळे ,
विक्रम घोरपडे, संदीप परीट,मदन डवरी ,केतन मगदुम प्रदिप पाटील ,रशिद जमादार .राहुल घोडके
,दत्ता नाकोळे. डॉ.जयवंत गोधडे आदी उपस्थित होते. सदर कार्यक्रमा साठी प्रा.सुनिल
विष्णुपंत खैरे यांचे विशेष सहकार्य लाभले.
Subscribe to:
Post Comments
(
Atom
)

No comments :
Post a Comment