Powered by Blogger.

Saturday, 18 February 2017

समाजवादी प्रबोधिनी इचलकरंजी येथे कार्यकर्ता प्रबोधन शिबिर

No comments :
मुरगुड प्रतिनिधो

समीर कटके

रविवार ता.१९फेब्रुवारी२०१७रोजी स.१०.३०ते सायं.५ यावेळेत इचलकरंजीत  कार्यकर्ता प्रबोधन

शिबीर आयोजित केले आहे.यावेळी मा.रत्नाकर महाजन(जेष्ठ विचारवंत व काँग्रेसचे प्रवक्ते)हे  समता,

समानता व समरसता;या विषयावर पहिल्या सत्रात तर दुसऱ्या सत्रात मा.प्रा.एन.डी.पाटील(जेष्ठ

विचारवंत नेते व समाजवादी प्रबोधिनीचे अध्यक्ष )हे समाजपरिवर्तन आणि प्रबोधन या विषयावर

मांडणी करणार आहेत.छत्रपती शिवाजी महाराज जयंती,कालवश आचार्य शांताराम गरुड यांचा ९०वा

जन्मदिनआणि शहिद गोविंदराव पानसरे यांचा दुसरा स्मृतिदिन या निमित्ताने हे शिबीर समाजवादी

प्रबोधिनी व प्रा.डॉ.एन .डी.पाटील प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केले

आहे.इचलकरंजीतील समाजवादी प्रबोधिनीच्या सभागृहात हे शिबीर होणार आहे.त्यात आपण सहभागी

व्हावे असे आवाहन संयोजक प्रसाद कुलकर्णी, डॉ जे एफ पाटील व डॉ टी एस पाटील यांनी केले आहे.

नियोजनासाठी विविध शाखा व कार्यकर्त्यांनी सकाळी 10 पूर्वी सहभागी होणाऱ्या कार्यकर्त्यांची संख्या

कळवावी असे आवाहन करण्यात आले आहे

No comments :

Post a Comment